Share Market Opening : शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात शुक्रवारी तेजीसह झाली आणि निफ्टीनं ७२ अंकांची गॅपअप ओपनिंग देत २४३८८ च्या पातळीवर व्यवहार करण्यास सुरुवात केली. सेन्सेक्समध्येही सुरुवातीची तेजी होती आणि तो १९६ अंकांनी वधारून ८००९४ च्या पातळीवर पोहोचला.
सुरुवातीच्या कामकाजादरम्यान आयटी क्षेत्रात चांगली खरेदी दिसून येत आहे. टीसीएस, विप्रो, एलटीआय लिमिटेड लिमिटेड, एचसीएल, इन्फोसिस, टेक महिंद्रा, आयटीसी आणि बीपीसीएल या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. तर मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, सन फार्मा, पॉवर ग्रिड, एल अँड टी या शेअर्समध्ये सुरुवातीच्या कामकाजादरम्यान घसरण दिसून येतेय.तर माझगाव डॉक या पीएसयू स्टॉकमध्ये वाढ दिसून येत आहे.
निफ्टीने गेल्या काही ट्रेडिंग सेशन्समध्ये बाय ऑन डिप्स दिसून येत आहे. प्रॉफिट बुकिंगवर निफ्टीच्या खालच्या स्तरावरून चांगली खरेदी झाली आहे. निफ्टीवर २४४०० ची लेव्हल रेजिस्टंन्स बनली आहे आणि ती ओलांडल्यास निफ्टीमध्ये चांगली अपसाईड मूव्ह दिसून येऊ शकते.