Join us

Share Market Opening : ओपनिंग बेलसहच शेअर बाजारात घसरण; Nifty पुन्हा २४००० च्या सपोर्ट लेव्हलच्या जवळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2024 10:03 AM

शेअर बाजारातील व्यवहार सोमवारी फ्लॅट लेव्हलवर सुरू झाले असले तरी बाजार उघडताच मोठी विक्री झाली आणि बाजारात घसरण दिसून आली.

शेअर बाजारातील व्यवहार सोमवारी फ्लॅट लेव्हलवर सुरू झाले असले तरी बाजार उघडताच मोठी विक्री झाली आणि बाजारात घसरण दिसून आली. निफ्टी २४,३१६ वर उघडला, पण पहिल्या पाच मिनिटात २०० अंकांनी घसरला आणि निफ्टी २४,१०० च्या खाली आला. सेन्सेक्सही पहिल्या पाच मिनिटांत ६०० अंकांनी घसरला आणि ७९१०० च्या पातळीवर आला.

सुरुवातीच्या व्यवहारात महिंद्रा अँड महिंद्रा, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, सिप्ला, इंडसइंड बँक आणि एचयुएल यांच्या शेअर्समध्ये निफ्टी ५० मध्ये वाढ दिसून येत आहे. तर निफ्टी ५० मधील उर्वरित शेअर्समध्ये घसरण दिसून आहे. बजाज ऑटो, सन फार्मा, हीरो मोटोकॉर्प, कोल इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री दिसून येत आहे.

अमेरिकेच्या बाजारातील घडामोडींवर, विशेषत: ५ नोव्हेंबरला होणाऱ्या अमेरिकेच्या निवडणुका आणि ८ नोव्हेंबरला फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक बैठकीवरही भारतीय शेअर बाजाराचं लक्ष असणार आहे.

अमेरिकन बाजारात तेजी

वॉल स्ट्रीटचे प्रमुख निर्देशांक शुक्रवारी तेजीसह बंद झाले. यापूर्वी आदल्या दिवशी यात मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती. Amazon.com आणि इंटेल कॉर्प सारख्या कंपन्यांच्या दमदार कमाईनंतर शुक्रवारी वॉल स्ट्रीटच्या तेजीनंतर अमेरिकन शेअर फ्युचर्समध्ये घसरण दिसून आली. तर जपानचा शेअर बाजार सुट्टीमुळे बंद आहे.

टॅग्स :शेअर बाजार