Share Market Opening : गेल्या आठवड्यात शेअर बाजारात मोठी घसरण झाल्यानंतर सोमवारी व्यवहाराला सकारात्मक सुरुवात झाली. निफ्टी ६९ अंकांच्या वाढीसह २५०८४ च्या पातळीवर उघडला, तर सेन्सेक्स २३८ अंकांनी वधारून ८१९२७ वर व्यवहार करत होता.
सुरुवातीच्या व्यवहारात श्रीराम फायनान्स, हीरो मोटोकॉर्प, एचसीएल टेक, आयटीसी आणि ट्रेंट या कंपन्यांच्या शेअर्समध्ये निफ्टी ५० पॅकमधून वाढ दिसून येत आहे. त्याचबरोबर टायटन कंपनी, ओएनजीसी, एचयूएल, अदानी पोर्ट्स, ब्रिटानिया या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. गेल्या आठवड्यात बाजारात मोठी घसरण झाली होती. सलग तीन आठवड्यांच्या तेजीनंतर गेल्या आठवड्यात देशांतर्गत बाजारात ४.५ टक्क्यांची घसरण झाली. मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे शेअर बाजारात घसरण दिसून आली.
अमेरिकन बाजारात तेजी
अर्थव्यवस्था खूपच कमकुवत होण्याची भीती असलेल्या गुंतवणूकदारांना अपेक्षेपेक्षा मजबूत रोजगाराच्या अहवालानं आश्वस्त केल्याने डाऊ शुक्रवारी विक्रमी उच्चांकी पातळीवर बंद झाला. तप नॅसडॅक १% पेक्षा जास्त वाढीसह बंद झाला.
तर दुसरीकडे कच्च्या तेलाच्या किमतीतही वाढ झाली आहे. सोमवारी कच्च्या तेलाच्या किमतीत सुरुवातीच्या व्यवहारात वाढ नोंदविण्यात आली. शुक्रवारी वर्षभरातील सर्वात मोठी साप्ताहिक वाढ नोंदविण्यात आली होती. मध्य-पूर्वेतील युद्धाच्या वाढत्या धोक्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या.