Join us  

Share Market Opening : दुसऱ्या दिवशीही नफा वसूली; १५० अंकाच्या घसरणीसह बाजार उघडला; IT शेअर्सवर दबाव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 9:56 AM

Share Market Opening : आठवड्याच्या पहिल्या दोन्ही दिवशी नवे विक्रम केल्यानंतर आता देशांतर्गत शेअर बाजारावर नफावसुलीचा दबाव दिसून येत आहे. यामुळे बुधवारी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी घसरणीसह सुरू झाले.

Share Market Opening : आठवड्याच्या पहिल्या दोन्ही दिवशी नवे विक्रम केल्यानंतर आता देशांतर्गत शेअर बाजारावर नफावसुलीचा दबाव दिसून येत आहे. यामुळे बुधवारी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी घसरणीसह सुरू झाले. व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला.

सकाळी ९.१५ वाजता सेन्सेक्स जवळपास १५० अंकांनी घसरून ८४,८३६.४५ अंकांवर उघडला. तर निफ्टी सुमारे ३० अंकांनी घसरून २५८९९.४५ अंकांवर खुला झाला. मात्र, नंतर बाजारात किंचित सुधारणा दिसून आली. सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी सेन्सेक्स ३० अंकांच्या घसरणीसह ८४,८८० अंकांच्या जवळ तर निफ्टी ५ अंकांच्या घसरणीसह २५,९३५ अंकांच्या जवळ व्यवहार करत होता.

बाजार सुरू होण्यापूर्वी दबावाची चिन्हं

देशांतर्गत बाजारात व्यवहार सुरू होण्यापूर्वी दबावाची चिन्हे दिसून येत होती. प्री-ओपन सेशनमध्ये सेन्सेक्स जवळपास ८० अंकांनी घसरून ८४,८३५ अंकांवर व्यवहार करत होता, तर निफ्टी सुमारे ४० अंकांच्या घसरणीसह २५,९०० अंकांच्या खाली व्यवहार करत होता. 

जागतिक बाजारपेठेची स्थिती काय?

अमेरिकेचा बाजार मंगळवारी तेजीसह बंद झाला. वॉल स्ट्रीटवर डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेज ०.२० टक्क्यांनी वधारून बंद झाला. एस अँड पी ५०० निर्देशांक ०.२५ टक्क्यांनी वधारला आणि टेक फोकस्ड निर्देशांक नॅसडॅक ०.५६ टक्क्यांनी वधारला. जपानचा निक्की फ्लॅट आहे, पण टोपिक्स ०.३ टक्क्यांनी वधारला आहे. दक्षिण कोरियाचा कोस्पी ०.४ टक्के आणि कॉस्डॅक ०.४३ टक्क्यांनी वधारला. हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक चांगली सुरुवात होण्याची चिन्हे दिसत आहेत.

प्रमुख शेअर्सची स्थिती

सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्समधील सुमारे २० शेअर्स रेड झोनमध्ये व्यवहार करत आहेत. सुरुवातीच्या सत्रात एशियन पेंट्सचे शेअर्स सर्वाधिक ०.८० टक्क्यांनी घसरले. टेक महिंद्रा, एचसीएल टेक, इन्फोसिस आणि टीसीएस सारख्या प्रमुख आयटी शेअर्समध्ये घसरण झाली. दुसरीकडे पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनचे शेअर्स ४ टक्क्यांहून अधिक वधारले. महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा स्टील या कंपन्यांचे शेअर्सही चांगल्या तेजीसह व्यवहार करत होते.

टॅग्स :शेअर बाजार