Join us  

Share Market Opening : सेन्सेक्सनं रचला इतिहास, पहिल्यांदाच ८०००० पार, निफ्टीही ऑल टाईम हायवर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 9:40 AM

सेन्सेक्सनं बुधवारी अखेर ८० हजारांच्या आकड्याला स्पर्श केला. शेअर बाजारातील तेजीत एचडीएफसी बँकेचं मोठं योगदान होतं. बँकेचे शेअर्स ३.५० टक्क्यांच्या वाढीसह उघडले.

शेअर बाजारात बुधवारी पुन्हा एकदा मोठी गॅप अप ओपनिंग दिसलं आणि निफ्टी २४२९२ च्या लेव्हलवर उघडला. तर सेन्सेक्स पहिल्यांदाच ८०००० च्या वर उघडला. सेन्सेक्सनं बुधवारी अखेर ८० हजारांच्या आकड्याला स्पर्श केला. शेअर बाजारातील तेजीत एचडीएफसी बँकेचं मोठं योगदान होतं. बँकेचे शेअर्स ३.५० टक्क्यांच्या वाढीसह उघडले.

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मोठ्या तेजीनंतर वरच्या पातळीवरून विक्रीचा दबाव होता, त्यानंतर बाजार फ्लॅट ते निगेटिव्ह बंद झाला. निफ्टी १८ अंकांनी घसरून २४१२४ च्या पातळीवर बंद झाला. प्री ओपन सत्रात निफ्टीमध्ये जोरदार तेजी दिसून आणि निफ्टी १६७ अंकांच्या वाढीसह २४२९२ वर उघडला, तर सेन्सेक्स ५९० अंकांच्या वाढीसह ८०,०३९ वर उघडला.

बाजाराच्या या बंपर तेजीमध्ये एचडीएफसी बँक, हिंडाल्को, एचडीएफसी लाइफ, कोटक महिंद्रा बँक यासारख्या शेअर्समध्ये खरेदीचं सत्र दिसून आलं, तर आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, इन्फोसिसचे शेअर्स काही घसरणीसह उघडले. या बाजारातील तेजीमध्ये फायनान्शियल शेअर्स, बँकिंग शेअर्स, मेटल आणि एफएमसीजी सेक्टरमोठी भूमिका बजावत आहेत. बाजारात आणखी तेजी येण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. 

टॅग्स :शेअर बाजार