Lokmat Money >शेअर बाजार > सोलर कंपनीचा शेअर बनलाय रॉकेट, लिस्टिंगपासून 2100% वाढलाय भाव, आता कंपनीनं केली मोठी घोषणा

सोलर कंपनीचा शेअर बनलाय रॉकेट, लिस्टिंगपासून 2100% वाढलाय भाव, आता कंपनीनं केली मोठी घोषणा

ओरियाना पॉवरचा IPO 2023 मध्ये ₹118 वर आला होता. तर कंपनीचा शेअर्स 155% च्या प्रीमियमसह 302 रुपयांवर सूचीबद्ध झाला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 19:34 IST2024-12-16T19:33:50+5:302024-12-16T19:34:43+5:30

ओरियाना पॉवरचा IPO 2023 मध्ये ₹118 वर आला होता. तर कंपनीचा शेअर्स 155% च्या प्रीमियमसह 302 रुपयांवर सूचीबद्ध झाला होता.

Share market oriana power stock surges 2100 percent from ipo price now sign mou with rajasthan | सोलर कंपनीचा शेअर बनलाय रॉकेट, लिस्टिंगपासून 2100% वाढलाय भाव, आता कंपनीनं केली मोठी घोषणा

सोलर कंपनीचा शेअर बनलाय रॉकेट, लिस्टिंगपासून 2100% वाढलाय भाव, आता कंपनीनं केली मोठी घोषणा

ओरियाना पॉवरचा शेअर सोमवारी 10% ने वाढून ₹2545 च्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला. महत्वाचे म्हणजे, एका बातमीनंतर, या शेअरमध्ये ही तेजी बघायला मिळत आहे. खरेतर, ओरियाना पॉवरने राजस्थानातील ग्रीन एनर्जी प्रोजेक्ट्सच्या विकासासाठी 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

काय म्हणते कंपनी? -
ओरियाना पॉवरने सोमवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जयपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या रायझिंग राजस्थान जागतिक परिषदेदरम्यान गुंतवणुकीबाबत कंपनीने राजस्थान सरकारसोबत सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. या करारानुसार, कंपनी राज्यातील सौर, ग्रीन हायड्रोजन आणि एनर्जी स्टोरेज सोल्यूशन्ससह (ESS) विविध प्रकल्पांच्या विकासासाठी 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल.

₹118 वर आला होता IPO -
ओरियाना पॉवरचा IPO 2023 मध्ये ₹118 वर आला होता. तर कंपनीचा शेअर्स 155% च्या प्रीमियमसह 302 रुपयांवर सूचीबद्ध झाला होता. अर्थात हा शेअर IPO किंमतीपासून जवळपास 2100% ने वधारला आहे. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांकी किंमत 2,984 रुपये तर 52 आठवड्यांची नीचांकी किंमत 450 रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप 5,057.44 कोटी रुपये एवढे आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: Share market oriana power stock surges 2100 percent from ipo price now sign mou with rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.