Lokmat Money >शेअर बाजार > या कंपनीला मिळाली ₹669 कोटींची ऑर्डर, शेअर खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड; ₹114 वर आला शेअर

या कंपनीला मिळाली ₹669 कोटींची ऑर्डर, शेअर खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड; ₹114 वर आला शेअर

इंट्राडे ट्रेडमध्ये कंपनीचा शेअर 12 टक्क्यांनी वाढून 114.65 रुपयांवर पोहोचला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 11:10 PM2023-11-16T23:10:30+5:302023-11-16T23:10:47+5:30

इंट्राडे ट्रेडमध्ये कंपनीचा शेअर 12 टक्क्यांनी वाढून 114.65 रुपयांवर पोहोचला आहे.

share market pennar industries share surges 12 percent after firm received 669 rupees share on 114 rupees | या कंपनीला मिळाली ₹669 कोटींची ऑर्डर, शेअर खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड; ₹114 वर आला शेअर

या कंपनीला मिळाली ₹669 कोटींची ऑर्डर, शेअर खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड; ₹114 वर आला शेअर

विविध प्रकारचे औद्योगिक प्रोडक्ट्स तयार करणाऱ्या पेन्नार इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये सोमवारी जबरदस्त तेजी दिसून आली आहे. इंट्राडे ट्रेडमध्ये कंपनीचा शेअर 12 टक्क्यांनी वाढून 114.65 रुपयांवर पोहोचला आहे. शेअरमध्ये आलेल्या या तेजीचे कारण म्हणजे, कंपनीला मिळालेली तगडी ऑर्डर. खरे तर, या कंपनीला विविध व्यवसाय क्षेत्रांत 669 कोटी रुपयांच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. मात्र, या ऑर्डर्स केव्हा मिळाल्या हे कंपनीने सांगितलेले नाही. मात्र, पुढील दोन तिमाहीत त्या एक्झिक्यूट होणे अपेक्षित असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

अशा आहेत ऑर्डर डिटेल्स -
हा स्टॉक आज दुपारी 1 वाजेपर्यंत बीएसईवर जवळपास 8 टक्क्यांनी वधारून 111.80 रुपयांवर व्यवहार करत होता. या वर्षी आतापर्यंत हा स्टॉक 89 टक्क्यांनी वर आहे. याच्या प्री-इंजिनिअर्ड बिल्डिंग्ज (PEB) व्हर्टिकलला आरएलआर इंफ्रा, एसएनजे डिस्टिलरीज, अंतरिक्ष ग्रुप, ताइन इंफ्रा, पॉवर मेक प्रोजेक्ट्स, एसआर एंटरप्रायजेस, टीव्हीएस सांगली आणि एमएसआर अॅसेट्सकडून ऑर्डर मिळाली आहे.

यूएसए स्थित सहायक कंपनी अॅसेन्ट बिल्डिंग्सला रेड हॉट बिल्डिंग्स, तारहील बिल्डिंग्स, जॉइनर कंस्ट्रक्शन, टीअँडडी काँक्रीट, टिफटन बिल्डिंग्स, डन बिल्डिंग्स, पीएस वेस्ट कंस्ट्रक्शन आणि जेए स्ट्रीटकडून ऑर्डर मिळाली आहे. तसेच, आता आपण अधिक मार्जिन असलेल्या उत्पादनांवर फोकस करत आहोत, असे कंपनीने म्हटले आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: share market pennar industries share surges 12 percent after firm received 669 rupees share on 114 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.