शेअर बाजारातील एनर्जी डेव्हलपमेन्ट कंपनी लिमिटेडचा शेअरला आज 5% ने वाढून 28.17 रुपयांवर पोहोचला होता. शेअरमध्ये ही तेजी जून तिमाहीच्या परिणामांमुळे आली आहे. याच बरोबर एफआयआयनेही कंपनीतील अपला वाटा 0.04 टक्क्यांनी वाढून 0.19 टक्के केला आहे. अर्थात FII ने जून तिमाहीत 71,252 नवे शेअर खरेदी केले आहेत. कंपनीचे वर्तमान मार्केट कॅप 133.81 कोटी रुपये एवढे आहे. तसेच या शेअरने गेल्या एका वर्षात 65 टक्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.
असे आहेत डेटेल्स -
तिमाही परिमानांनुसार, आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीने 3.94 रुपयांचा महसूल नोंदवला आहे. Q4 FY24 साठी परिचालन घाटा 0.99 कोटी रुपये होता. Q4 FY24 साठी शुद्ध घाटा 5.14 कोटी रुपये होता. वार्षिक परफॉर्मन्सचा विचार करता कंपनीने FY24 मध्ये 30.01 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट केला होता. तर FY23 मध्ये तो 37.44 कोटी रुपये एवढा होता.
शेअरहोल्डिंग पॅटर्न -
शेअरहोल्डिंग पॅटर्नचा विचार करता, प्रमोटर्सकडे कंपनीचे 58.14 टक्के शेअर आहेत. तर, सार्वजनिक अथवा किरकोळ गुंतवणूकदारांचा वाटा 41.66 टक्के एवढा आहे आणि नव्या अपडेटनुसार, FII ने त्यांचा हिस्सा 0.04 टक्क्यांवरून 0.19 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)