शेअर बाजारात बुधवारी टिटागड रेल्वे सिस्टिम्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. कंपनीचा शेअर 1,025.10 रुपयांवर ट्रेड करत आहे. या शेअरमध्ये ही तेजी येण्याचे एक मोठे कारण आहे. खरे तर, टिटागड रेल्वे सिस्टिम्स लिमिटेडने पात्र संस्थात्मक खरेदीदारांना नवे शेअर्स जारी करून 699.9 कोटी रुपये उभारले अथवा जमवले आहेत. महत्वाचे म्हणजे, या कंपनीला पूर्वी टिटागड वॅगन्स लिमिटेड नावाने ओळखले जात होते.
काय म्हणतेय कंपनी? -
यासंदर्भात शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत कंपनीने म्हटले आहे की, क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट (क्यूआयपी) समितीने आज झालेल्या आपल्या बैठकीत 75,02,679 इक्विटी शेअर्स पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (क्यूआयबी) 933 रुपये प्रति इक्विटी शेअर दराने वाटप करण्यास मंजुरी दिली आहे. ज्यांची एकूण किंमत 69,999.99 लाख रुपये एढी आहे.'' कोलकात्याती ही कंपनी एक आघाडीची रेल्वे 'रोलिंग स्टॉक' निर्माता कंपनी आहे.
अशी आहे कंपनीच्य शेअर्सची स्थिती -
टीटागड रेल्वे सिस्टिम्स लिमिटेडचा शेअर गेल्या पाच दिवसांत 7% टक्क्यांनी वधारला आहे. या शेअरने एका महिन्यात 25.56% तर गेल्या सहा महिन्यांत 119.72% एवढा परतावा दिला आहे. या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 1,073.65 रुपये एवढा, तर नीचांक 182 रुपये एवढा आहे. कंपनीचे मार्केट कॅप 13,049.03 कोटी रुपये एढे आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)