Join us  

₹100 पेक्षाही कमी किमतीच्या शेअरची कमाल, रॉकेट बनलाय रेल्वेचा शेअर; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 1:15 AM

या शेअरने केवळ 100 टक्क्यांहून अधिकचा परतावाच दिला नाही, तर हा शेअर पेनी स्टॉकच्या कॅटेगिरीतून बाहेरही पडत आहे.

रेल्वे क्षेत्राशी संबंधित कंपन्यांच्या शेअरने 2023 या वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मालामालकेले आहे. रेल्वेच्या काही शेअर्सनी तर या वर्षात 100 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. असाच एक शेअर आहे भारतीय रेल्वे वित्त निगम (आयआरएफसी)चा. या शेअरने केवळ 100 टक्क्यांहून अधिकचा परतावाच दिला नाही, तर हा शेअर पेनी स्टॉकच्या कॅटेगिरीतून बाहेरही पडत आहे. कारण याची किंमत 100 रुपयांच्या पारही गेली आहे.

शेअरची किंमत - आयआरएफसीचा शेअर शुक्रवारी काहीसा दबावात दिसला आणि एक टक्क्याने घसरून 97 रुपयांवर आला. मात्र गेल्या 20 डिसेंबरला या शेअरने बीएसईवर 104.14 रुपयांचा 52-आठवड्यांचा उच्चांक गाठला होता. याचा विचार करता, 2023 मध्ये या शेअरमध्ये 216.53% टक्क्यंची जबरदस्त वाढ झाली आहे. 2023 च्या सुरुवातीला हा शेअर 32 रुपयांवर होता.

या कंपनीने सप्टेंबर तिमाहीदरम्यान 1,549.87 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. एक वर्षांपूर्वी हा 1,714.28 कोटी रुपये होता. ऑपरेशन्समधून एकूण महसूल 6,766.32 कोटी रुपये एवढा होता. तर एक वर्षापूर्वी हा 5,809.80 कोटी रुपये होता. शेअरहोल्डिंगसंदर्भात बोलायचे झाल्यास, तब्बल 86.36 टके हिस्सेदारी प्रमोटर्सकडे आहे. तर, पब्लिक शेअरहोल्डिंग 13.64 टक्के आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक