Join us  

₹4 च्या शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता खरेदीसाठी उडाली एकच झुंबड!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 9:53 PM

या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 67.51 रुपये तर नीचांक 4.86 रुपये एवढा आहे.

शेअर बाजारातील राठी स्टील अँड पॉवर लिमिटेडचा शेअर सद्या दबरदस्त परतावा देत आहे. हा शेअर गेल्या शुक्रवारी 10% पर्यंत वधारला असून 54.18 टक्क्यांवर पोहोचला. गेल्या एका वर्षात हा शेअर जवळपास 1000% पर्यंत वधारला आहे. या कालावधीत याची किंमत 4 रुपयांनी वाढून सध्याच्या पातळीवर पोहोचला आहे.

या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 67.51 रुपये तर नीचांक 4.86 रुपये एवढा आहे. कंपनीच्या मार्केट कॅपचा विचार करता, कंपनीचे मार्केट कॅप 451 कोटी रुपये एवढे आहे. मार्च 2024 पर्यंत कंपनीच्या प्रमोटर्सकडे 40.32 टक्के वाटा होता, डीआयआयकडे 2.53 टक्के तर जनतेकडे एकूण 57.15 टक्के वाटा होता.कंपनी व्यवसाय -राठी स्टील अँड पॉवर लिमिटेड ही 1971 मध्ये स्थापन झालेली कंपनी आहे. दिल्लीस्थित पोलाद निर्माता राठी स्टील अँड पॉवर लिमिटेड 1,000 रिटेल दुकानांवर "राठी" ब्रँडने रीबर्स आणि वायर रॉड्स ऑफर करते. तसेच, ब्राइट बार्स आणि फास्टनर्स सारख्या डाउनस्ट्रीम वस्तूंच्या मुख्य प्रोडक्ट्सना स्टेनलेस स्टील प्रडक्ट्सचा पुरवठाही करते. त्यांच्या ग्राहकांमध्ये भारतीय विमानतळ प्राधिकरण, दिल्ली मेट्रो रेल्वे आणि एनटीपीसी सारख्या नामांकित नावांचाही समावेश आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकपैसा