शेअर बाजारात गेल्या शुक्रवारी अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स पॉवरच्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले होते. हा शेअर शुक्रवारी 4.98% च्या तेजीसह 22.13 रुपयांवर बंद झाला. 8 जानेवारी 2024 रोजी हा शेअर 33.10 रुपयांवर बंद झाला. हा रिलायन्स पॉवरच्या शेअरचा52 आठवड्यांतील उच्चांक आहे.
28 मार्च 2023 रोजी हा शेअर 9.05 रुपयांवर बंद झाला होता. हा 52 आठवड्यांचा नीचांक होता. रिलायन्स पॉवरचा शेअर 23 मे 2008 रोजी 274.84 रुपयांवर होता. यानंतर हा शेअर 99 टक्क्यांपेक्षाही अधिकने घसरून 27 मार्च 2020 रोजी 1.13 रुपयांवर पोहोचला होता. मात्र यानंतर या शेअरमध्ये जबरदस्त रिकव्हरी दिसून आली
असं आहे तेजीचं कारण -रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये ही तेजी कंपनीशी संबंधित एका वृत्तामुळे आली आहे. रिलायन्स पॉवरने म्हटले आहे की, कंपनीने 14 मार्चला आयसीआयसीआय बँक लिमिटेडसोबत एक करार केला आहे. याअंतर्गत रिलायन्स पॉवर लिमिटेडची प्रमोटर रिलायन्स इंफ्रा आर्थिक सुविधेसाठी कॉर्पोरेट गॅरेंटर बनली आहे. आयसीआयसीआय बँकेजवळ रिलायन्स इंफ्रामध्ये 211 इक्विटी शेअर आणि रिलायन्स पॉवरमध्ये 886 शेअर्स आहेत.
कुणाकडे किती हिस्सेदारीशेअरहोल्डिंग पॅटर्नसंदर्भात बोलायचे झाल्यास, डिसेंबरपर्यंत रिलायन्स पॉवमध्ये प्रमोटर्सचा वाटा 24.49 टक्के होती. याच प्रमाणे, पब्लिक शेअरहोल्डिंग 75.51 टक्के होती. अनिल अंबानी हे कंपनीचे प्रमोटर आहेत. त्यांच्याकडे रिलायन्स पॉवरचे 4,65,792 शेअर आहेत. प्रमोटरमध्ये रिलायन्स समूहाची कंपनी रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चरही आहे. हिच्याकडे रिलायन्स पॉवरचे 93,01,04,490 शेअर अथवा 24.40 टक्के हिस्सेदारी आहे. तर, अनिल अंबानी यांची पत्नी टीना अंबानी यांच्याकडे एकूण 4,12,708 शेअर आहेत.(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)