Lokmat Money >शेअर बाजार > कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; ₹110 वर पोहोचला भाव

कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; ₹110 वर पोहोचला भाव

ट्रेडिंग दरम्यान हा शेअर 110 रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीला मिळालेल्या ₹94.13 कोटींच्या नव्या काँट्रॅक्टमुळे शेअर्समध्ये ही तेजी दिसून येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 02:32 PM2024-03-19T14:32:08+5:302024-03-19T14:32:33+5:30

ट्रेडिंग दरम्यान हा शेअर 110 रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीला मिळालेल्या ₹94.13 कोटींच्या नव्या काँट्रॅक्टमुळे शेअर्समध्ये ही तेजी दिसून येत आहे.

Share market rpp infra projects share hits 5 percent upper circuit after get 3 new order 110 rupees price | कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; ₹110 वर पोहोचला भाव

कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; ₹110 वर पोहोचला भाव

शेअर बाजारात मोठी घसरण झाली असतानाच RPP इन्फ्रा प्रोजेक्ट्सच्या शेअरला मंगळवारी 5% चे अप्पर सर्किट लागले. ट्रेडिंग दरम्यान हा शेअर 110 रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीला मिळालेल्या ₹94.13 कोटींच्या नव्या काँट्रॅक्टमुळे शेअर्समध्ये ही तेजी दिसून येत आहे.

अशी आहे ऑर्डर - 
आरपीपी (RPP) इन्फ्रा प्रोजेक्ट्सने स्टॉक एक्स्चेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे की, त्यांनी स्टेट इंडस्ट्रीज प्रमोशन कॉर्पोरेशन ऑफ तामिळनाडू लिमिटेड (SIPCOT)कडून ऑर्डर मिळवली आहे. या ऑर्डरमध्ये SIPCOT इंडस्ट्रियल पार्क, शूलगिरी, होसूर फेज IV येथे आरसीसी नाल्यांचे बांधकाम, आरसीसी कल्व्हर्ट, किरकोळ पूल, पाईप कॉजवे आणि पथदिवे व्यवस्था यांचा समावेश आहे.

डिसेंबरमध्ये मिळाल्या तीन ऑर्डर -
यापूर्वी, डिसेंबर महिन्यात आरपीपी इन्फ्रा प्रोजेक्ट्सला 3 नवीन ऑर्डर मिळाल्या आहेत. यात ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशन पॅकेज 4 च्या विस्तारित भागात M1 आणि M2 कंपोनन्टमध्ये स्टॉर्म वॉटर ड्रेनच्या बांधकामाचा समावेश आहे. या अंतर्गत झोन 12 आणि 14 मध्ये वेगवेगळ्या रस्त्यांचे बांधकाम केले जाणार आहे, यासाठी ₹70.50 कोटी एवढा खर्च येणार आहेत. या व्यतिरिक्त झोन 12 आणइ 14 च्या वेगवेगळ्या रस्त्यांना कव्हर करणारे पॅकेज 5 ला ₹53.17 कोटींचा करार करण्यात आला होता. झोन 14 च्या वेगवेगळ्या रस्त्यांना कव्हर करणाऱ्या पॅकेज 8 ला ₹59.92 कोटींमध्ये कॉन्ट्रॅक्ट करण्यात आला होता. 

महत्वाचे म्हणजे, आरपीपी ही भारतात तेजीने वाढणारी इंटीग्रेट ईपीसी कंपन्यांपैकी एक आहे. महामार्ग, रस्ते, पूल, नागरी निर्माण, सिंचन, आदी क्षेत्रात ही कंपनी कार्यरत आहे.

शेअरचा परफॉर्मन्स -
कंपनीच्या शेअरने फेब्रुवारी 2024 मध्ये 161.45 रुपयांचा 52 आठवड्यांतील उच्चांक गाठला होता. हा शेअर एप्रिल 2023 ते जानेवारी 2024 पर्यंत ₹39.80 वाढून ₹146.30 वर पोहोचला होता. 

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: Share market rpp infra projects share hits 5 percent upper circuit after get 3 new order 110 rupees price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.