Share Market: लोखंड आणि पोलाद उत्पादने बनवणाऱ्या रामा स्टील ट्यूब्स या कंपनीच्या मल्टीबॅगर शेअर्सने यावर्षी गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न्स दिले आहेत. रामा स्टील ट्यूब्सच्या शेअर्सनी सोमवारी 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. सोमवारी कंपनीचे शेअर्स जवळपास 5% वाढून रु. 172.25 वर पोहोचले. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 42.72 रुपये आहे. रामा स्टील ट्यूब्सच्या शेअर्सने अलीकडेच त्याचे शेअर्स 1:5 च्या प्रमाणात विभाजित केले आहेत.
शेअर्सनी यावर्षी 140% रिटर्न्स दिलेरामा स्टील ट्यूब्सच्या शेअर्सनी या वर्षी आतापर्यंत गुंतवणूकदारांना 140% रिटर्न्स दिले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला, 3 जानेवारी 2022 रोजी, कंपनीचे शेअर्स BSE वर 71.21 रुपये होते. 14 नोव्हेंबर 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर रु.172.25 वर व्यवहार करत आहेत. रामा स्टील ट्यूब्सच्या शेअर्सनी गेल्या 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना 158% परतावा दिला आहे. तर, गेल्या 1 महिन्यात या शेअर्समध्ये सुमारे 42% वाढ झाली आहे.
1 लाखाचे झाले 33 लाखांहून अधिकरामा स्टील ट्यूब्सच्या शेअर्सनी गेल्या अडीच वर्षांत गुंतवणूकदारांना 2500% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. 31 जुलै 2020 रोजी कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर रु.5.13 वर होते. 14 नोव्हेंबर 2022 रोजी कंपनीचे शेअर्स रु. 172.25 वर व्यवहार करत आहेत. जर एखाद्या व्यक्तीने 31 जुलै 2020 रोजी रामा स्टील ट्यूब्सच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर सध्या या शेअरची किंमत 33.57 लाख रुपये झाली असती. रामा स्टील ट्यूब्सच्या शेअर्सनी गेल्या एका वर्षात 230% परतावा दिला आहे.
डिस्क्लेमर: आम्ही फक्त कंपनीच्या शेअर्सबद्दल माहिती देत आहोत. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही, गुंतवणूक करण्यापूर्वी जाणकारांचा सल्ला घ्या.