Join us  

6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 4:42 PM

चीनने नुकतीच आपली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रोत्साहन पॅकेज जाहीर केले होते...

भारतीय शेअर बाजरात गेल्या आठवड्यात पाचही दिवस घसरण दिसून आली. आज सकाळच्या सुमारास बाजार तेजीसह खुला झाला. मात्र दिवस सरताना बाजारात पुन्हा एकदा घसरण बघायला मिळाली. व्यापारादरम्यान सेन्सेक्स 800 अंकांनी घसरला. तर निफ्टीही 230 अंकांपेक्षा अधिक घसरला. गेल्या सहा दिवसांत गुंतवणूकदारांचे किमान 20 लाख कोटी रुपये स्वाहा झाले आहेत. परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून रोख काढून चीनी बाजारात गुंतवणूक करत आहेत. चीनने नुकतीच आपली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रोत्साहन पॅकेज जाहीर केले होते.

जागतिक ब्रोकरेज फर्म CLSA ने भारतीय इक्विटीतून आपली गुंतवणूक कमी करून चीनमध्ये गुंतवणूक केली आहे. CLSA ने म्हटले आहे की, आपण भारतातील ओव्हरवेट 20% ने कमी करून 10% करत चीनला 5% ओव्हरवेट करत आहोत. CLSA च्या म्हणण्याप्रमाणे, तीन कारणांमुळे भारतीय इक्विटीवर परिणाम होत आहे. यात तेलाची किंमत, आयपीओ बूम आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा समावेश आहे.

चीन सरकारच्या आश्वासनांबाबत साशंकता -परदेशी गुंतवणूकदार चिनी इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी रांगेत आहेत. साधारणपणे 2-3 वर्षांच्या खराब प्रदर्शनानंतर, चीनच्या शेअर बाजारात तेजी परतली आहे. गेल्या आठवड्यात निफ्टीमध्ये 4.5% ची घसरण दिसून आली. या कालावधीत एफआयआयने भारतात 40500 कुटींहून अधिकच्या शेअर्सची विक्री केली. मात्र, सर्वच ग्लोबल इन्व्हेस्टर्स चीनला जात नाहीयत. इन्व्हेस्को, जेपी मॉर्गन, एचएसबीसी आणि नोमुरा हे चीन सरकारच्या आश्वासनांबाबत साशंक आहेत.

हाँगकाँग आणि चीनसाठी इन्व्हेस्कोचे मुख्य गुंतवणूक अधिकारी रेमंड मा यांनी म्हटले आहे की, अल्पावधीत चीनची बाजारपेठ आकर्षक दिसू शकते परंतु शेवटी लोक मूलभूत गोष्टींकडे परत येतील. फ्लोरिडा स्थित GQG पार्टनर्सचे राजीव जैन म्हणाले की 2022 च्या शेवटी चीनमध्ये साथीच्या रोगाशी संबंधित निर्बंध संपल्यानंतर असेच वातावरण दिसले होते, परंतु ते काही दिवसांतच संपले.

हॉन्ग कॉन्ग और चीन के लिए इनवेस्कोचे मुख्य गुंतवणूक अधिकारी रेमंड मा यांनी म्हटले आहेकी, शॉर्ट टर्मसाठी चीनी बाजार आकर्षक वाटू शकतो. मात्र, शेवटी लोक मूलभूत गोष्टींकडे पुन्हा परततील. फ्लोरिडा येथील GQG पार्टनर्सचे राजीव जैन यांनी म्हटले आहे की, 2022 अखेरीस साथीच्या रोगांशी संबंधित निर्बंध हटल्यानंतर चीनमध्ये असेच वातावरण दिसले होते, मात्र ते काही दिवसांतच संपले.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूकचीन