आयटी क्षेत्रातील शेअर्सच्या प्रचंड विक्रीमुळे देशांतर्गत शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक लागल. बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 887.64 अंकांनी म्हणजेच 1.31 टक्क्यांनी घसरून 66,684.26 अंकांच्या पातळीवर बंद झाला. त्याचप्रमाणे, एनएसई निफ्टी 234.15 अंकांच्या म्हणजेच 1.17 टक्क्याच्या घसरणीसह 19,745 अंकांच्या पातळीवर बंद झाला. इन्फोसिसचा शेअर निफ्टीवर सर्वाधिक 7.73 टक्क्यांनी घसरून बंद झाला.
माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रीय निर्देशांक चार टक्क्यांनी घसरला. त्याचप्रमाणे एफएमसीजी आणि मेटल सेक्टरमध्ये प्रत्येकी एका टक्क्याची घसरण दिसून आली. त्याचवेळी, कॅपिटल गुड्स निर्देशांकात 1.7 टक्क्यांची उसळी दिसून आली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक किरकोळ बदलांसह बंद झाले.
या शेअर्समध्ये घसरणआज, बीएसई सेन्सेक्समध्ये इन्फोसिसच्या समभागांना सर्वात जास्त 7.73 टक्क्यांची घसरण झाली. त्याचप्रमाणे हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडमध्ये 3.65 टक्के, एचसीएल टेकमध्ये 3.33 टक्के आणि विप्रोमध्ये 3.07 टक्क्यांची घसरण झाली. याशिवाय टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज, टेक महिंद्रा, जेएसडब्ल्यू स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा, इंडसइंड बँक, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, आयटीसी, टायटन, टाटा स्टील आणि बजाज फायनान्स या कंपन्यांच्या शेअर्समध्येही घसरण दिसून आली.
या शेअर्समध्ये तेजीलार्सन अँड टुब्रो, एनटीपीसी, एसबीआय, कोटक महिंद्रा बँक, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक आणि सन फार्मा यांचे शेअर्स आज सेन्सेक्सवर वाढीसह बंद झाले.