Join us  

Share Market : सेन्सेक्समध्ये १३३१ अंकांची तेजी; निफ्टी २४५४० वर; सर्वच क्षेत्र ग्रीन झोनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 4:12 PM

शेअर बाजारात आठवड्याची सांगता तेजीसह झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही दीड टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स १३०० अंकांनी वधारला, निफ्टीही जवळपास ४०० अंकांनी वधारला.

शेअर बाजारात आठवड्याची सांगता तेजीसह झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही दीड टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स १३०० अंकांनी वधारला, निफ्टीही जवळपास ४०० अंकांनी वधारला. निफ्टी मिडकॅप २ टक्के आणि स्मॉलकॅप शेअरही जवळपास समान वाढीसह बंद झाले. मजबूत जागतिक संकेतांमुळे बाजारात शानदार तेजी आल्यानंतर निफ्टी ३९७ अंकांनी वधारून २४,५४१ वर बंद झाला. सेन्सेक्स १३३० अंकांनी वधारून ८०,४३६ वर तर निफ्टी बँक ७८९ अंकांनी वधारून ५०,५१६ वर बंद झाला. आयटी, ऑटो आणि रियल्टी निर्देशांकात सर्वाधिक वाढ नोंदविण्यात आली.

या शेअर्समध्ये तेजी / घसरण

आजच्या व्यवहारात टेक महिंद्राचे शेअर्स ४.०२ टक्के, टाटा मोटर्स ३.४७ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा ३.४५ टक्के, टीसीएस २.९१ टक्के, एचसीएल टेक २.६५ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट २.६० टक्के, टाटा स्टील २.२९ टक्के, आयटीसी २.१७ टक्के, आयसीआयसीआय बँक २.१७ टक्के, अदानी पोर्ट्स २.०७ टक्क्यांनी वधारले. तर दुसरीकडे मॅक्स फायनान्शिअल २.२१ टक्के, अरबिंदो फार्मा १.१२ टक्के, व्होल्टास ०.९८ टक्के, पीएनबी ०.४७ टक्के, एसआरएफ ०.४२ टक्के आणि अपोलो टायर्सच्या शेअरमध्ये ०.२६ टक्क्यांनी घसरण झाली.

संपत्तीत सात लाख कोटींची वाढ

शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत जोरदार वाढ झाली आहे. बीएसईमध्ये लिस्डेट कंपन्यांचं बाजार भांडवल पुन्हा ४५१.५४ लाख कोटी रुपयांवर बंद झालं, जे मागील सत्रात ४४४.२९ लाख कोटी रुपये होतं. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांना ७.२५ लाख कोटी रुपयांचा नफा झाला.

टॅग्स :शेअर बाजार