Lokmat Money >शेअर बाजार > 3 रुपयांना खरेदी केलेला शेअर आता 300 रुपयांना विकण्याची तयारी, 5 वर्षांत 100 पट परतावा!

3 रुपयांना खरेदी केलेला शेअर आता 300 रुपयांना विकण्याची तयारी, 5 वर्षांत 100 पट परतावा!

हे दिग्गज गुंतवणूकदार कंपनीतील आपले शेअर्स विकत आहेत. त्यांनी होनासा कंझ्यूमरमध्ये लावलेल्या आपल्या पैशांवर 100 पटहून अधिकचा परतावा मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 04:17 PM2023-10-27T16:17:42+5:302023-10-27T16:18:01+5:30

हे दिग्गज गुंतवणूकदार कंपनीतील आपले शेअर्स विकत आहेत. त्यांनी होनासा कंझ्यूमरमध्ये लावलेल्या आपल्या पैशांवर 100 पटहून अधिकचा परतावा मिळत आहे.

share market Share bought at 3 rupees now ready to sell at 300 rupees, got 100 times return in 5 years | 3 रुपयांना खरेदी केलेला शेअर आता 300 रुपयांना विकण्याची तयारी, 5 वर्षांत 100 पट परतावा!

3 रुपयांना खरेदी केलेला शेअर आता 300 रुपयांना विकण्याची तयारी, 5 वर्षांत 100 पट परतावा!

शेअर बाजारातील मामाअर्थची (Mamaearth) पॅरेंट कंपनी होनासा कंझ्युमरचा आयपीओ 31 ऑक्टोबरला खुला होत आहे. या कंपनीच्या आयपीओचा प्राइस बँड 308-324 रुपयांना आहे. स्नॅपडीलचे को-फाउंडर्स कुणाल बहल आणि रोहित बंसल, शिल्पा शेट्टी, मॅरिकोचे ऋषभ हर्ष मारीवाला यांच्यासह अनेक दिग्गज मंडळींनी या कंपनीत पैसा लावलेला आहे. 

आता हे दिग्गज गुंतवणूकदार कंपनीतील आपले शेअर्स विकत आहेत. त्यांनी होनासा कंझ्यूमरमध्ये लावलेल्या आपल्या पैशांवर 100 पटहून अधिकचा परतावा मिळत आहे. अर्थात या कंपनीतील त्यांच्या गुंतवणुकीचे मुल्य बऱ्याच पटीने वाढले आहे.

स्नॅपडीलच्या को-फाउंडर्सना 100 पटहून अधिक परतावा - 
स्नॅपडीलचे को-फाउंडर्स कुणाल बहल आणि रोहित बंसल यांनी 2018 मध्ये होनासा कंझ्यूमर (Honasa Consumer) मध्ये गुंतवला होता. त्यांनी केवळ 3.21 रुपये प्रति शेअरने नुसार कंपनीचे शेअर खरेदी केले होते. आता कुणाल आणि रोहित दोघेही कंपनीचे 1,193,250 शेअर विकत आहेत. कुणाल आणि रोहित यांना 100 परटहून अधिक परतावा मिळत आहे. होनासा कंज्यूमरचे आयपीओचे सब्सक्रिशन 2 नोव्हेंबर 2023 बंद होईल.

याशिवाय, मॅरिकोचे ऋषभ हर्ष मारीवाला यांनी 6.05 रुपये प्रति शेअर या अॅव्हरेज कॉस्टवर मामाअर्थची पॅरेंट कंपनी होनासा कंझ्यूमरच्या शेअरची खरेदी केली होती.
 

Web Title: share market Share bought at 3 rupees now ready to sell at 300 rupees, got 100 times return in 5 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.