मिनी रत्न कंपनी SJVN च्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी दिसून आली आहे. कंपनीचा शेअर गुरुवारी 13 टक्क्यांहून अधिक वधारला असून 115.45 रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीच्या शेअरमध्ये ही तेजी सोलर प्रोजेक्टची एक मोठी ऑर्डर मिळाल्यानंतर आली आहे. एसजेव्हीएनचे रिन्यूएबल युनिट एसजेव्हीएन ग्रीन एनर्जी लिमिटेडला (SGEL) ही ऑर्डर गुजरात ऊर्जा विकास निगम लिमिटेडकडून मिळाली आहे. कंपनीला 500 मेगावॅट सोलर प्रोजेक्टसाठी लेटर ऑफ इंटेंट (LOI) मिळाले आहे.
जवळजवळ 2700 कोटी रुपयांचा प्रोजेक्ट -
या सोलर प्रोजेक्टच्या कंस्ट्रक्शन आणि डिव्हलपमेंटची किंमत जवळपास 2700 कोटी रुपये एवढी आहे. हा प्रोजेक्ट खावडामध्ये GIPCL सोलर पार्कमध्ये जेव्हलप केला जाईल. यापूर्वी, एसजेव्हीएन ग्रीन एनर्जी लिमिटेडने या वर्षात 25 जानेवारीला गुजरात ऊर्जा विकास निगम लिमिटेडसोबत टॅरिफ बेस्ड कम्पेटिटिव्ह बिडिंगच्या माध्यमाने 500 मेगावॅटचा प्रोजेक्ट मिळवला होता. हा प्रोजेक्ट कंपनीला बिल्ड ऑन अँड ऑपरेट बेसिसवर 2.54 रुपये प्रती युनिटच्या टेरिफवर मिळाला आहे.
1 वर्षात 265% हून अधिकची तेजी -
एसजेव्हीएनच्या (SJVN) शेअरमध्ये गेल्या एका वर्षात जबरदस्त तेजी दिसून आली आहे. एका वर्षात मिनी रत्न कंपनी एसजेव्हीएनचा शेअर 265 टक्क्यांहून अधिक वधारला आहे. कंपनीचा शेअर 14 मार्च 2023 रोजी 31.48 रुपयांवर होता. तो 14 मार्च 2024 रोजी 115.45 रुपयांवर पोहोचला.
गेल्या 6 महिन्यांचा विचार करता, कंपनीच्या शेअरमध्ये 48 टक्क्यांहून अधिकची तेजी आली आहे. कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 170.45 रुपये आहे. तर, निचांक 30.39 रुपये एवढा आहे. गेल्या 4 चार वर्षांचा विचार करता, एसजेव्हीएनच्या शेअरमध्ये जवळपास 470 टक्क्यांची तेजी आली आहे. या कालावधीत कंपनीचा शेअर 20.35 रुपयांवरून 115.45 रुपयांवर पोहोचला आहे.