शेअर बाजारातील स्किपर लिमिटेडचा (Skipper Ltd) शेअर गेल्या एका वर्षापासून जबरदस्त परतावा देत आहे. आज अर्थात बुधवारी कंपनीचा शेअर 309.20 रुपयांवर पोहोचला आहे. एका वर्षापूर्वी या शेअरची किंमत ₹90 एवढी होती. म्हणजेच, या कालावधीत या शेअरने सुमारे 260% एवढा जबरदस्त परतावा दिला आहे.
हा शेअर मार्च 2020 च्या आपल्या ₹16.70 प्रति शेअर या लो प्राइसवरून आतापर्यंत 1795% वर पोहोचला आहे. 26 फेब्रुवारीला हा शेअर पहिल्यांदाच ₹400 वर पोहोचला आणि ₹401 या ऑल टाइम हायवर पोहोचला आहे.
सातत्याने देतोय बंपर परतावा -
स्किपरचा शेअर जुलै 2022 पासून सातत्याने वाढत आहे. गेल्या 18 महिन्यांपैकी 12 महिन्यांत हा शेअर पॉझिटिव्ह राहिला आहे आणि 510% चा परतावा दिला आहे. या शेअरने जून 2023 मध्ये आपला सर्वाधिक मंथली लाभ मिळवला आहे. गेल्या महिन्याभरता हा शेअर जवळपास 50% ने वधारला आहे.
फेब्रुवारी महिन्यात कंपनीने पॉवर ग्रिड कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडसाठी एक नवी 765 केव्ही ट्रान्समिशन लाइन प्रकल्पाचे डिझाइन, सप्लाय आणि निर्मितीसाठी ₹737 कोटींची मोठी ऑर्डर मिळवली आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)