Join us

याला म्हणतात शेअरची कमाल...! ₹90 च्या स्टॉकमध्ये तुफान तेजी, 12 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 6:46 PM

हा शेअर मार्च 2020 च्या आपल्या ₹16.70 प्रति शेअर या लो प्राइसवरून आतापर्यंत 1795% वर पोहोचला आहे. 26 फेब्रुवारीला हा शेअर पहिल्यांदाच ₹400 वर पोहोचला आणि  ₹401 या ऑल टाइम हायवर पोहोचला आहे.

शेअर बाजारातील स्किपर लिमिटेडचा (Skipper Ltd) शेअर गेल्या एका वर्षापासून जबरदस्त परतावा देत आहे. आज अर्थात बुधवारी कंपनीचा शेअर 309.20 रुपयांवर पोहोचला आहे. एका वर्षापूर्वी या शेअरची किंमत ₹90 एवढी होती. म्हणजेच, या कालावधीत या शेअरने सुमारे 260% एवढा जबरदस्त परतावा दिला आहे. 

हा शेअर मार्च 2020 च्या आपल्या ₹16.70 प्रति शेअर या लो प्राइसवरून आतापर्यंत 1795% वर पोहोचला आहे. 26 फेब्रुवारीला हा शेअर पहिल्यांदाच ₹400 वर पोहोचला आणि  ₹401 या ऑल टाइम हायवर पोहोचला आहे.

सातत्याने देतोय बंपर परतावा - स्किपरचा शेअर जुलै 2022 पासून सातत्याने वाढत आहे. गेल्या 18 महिन्यांपैकी 12 महिन्यांत हा शेअर पॉझिटिव्ह राहिला आहे आणि 510% चा परतावा दिला आहे. या शेअरने जून 2023 मध्ये आपला सर्वाधिक मंथली लाभ मिळवला आहे. गेल्या महिन्याभरता हा शेअर जवळपास 50% ने वधारला आहे. 

फेब्रुवारी महिन्यात कंपनीने पॉवर ग्रिड कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडसाठी एक नवी 765 केव्ही ट्रान्समिशन लाइन प्रकल्पाचे डिझाइन, सप्लाय आणि निर्मितीसाठी ₹737 कोटींची मोठी ऑर्डर मिळवली आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) 

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकपैसा