Join us  

SBI चे ATM बसवणार ही कंपनी, बातमी येताच शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड, गुंतवणूकदारांची चांदी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 6:43 PM

एका पॉझिटिव्ह बातमीने या शेअरच्या किंमतीत तेजी दिसून आली आहे...!

आज आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी अर्थात शुक्रवारी शेअर बाजारात चढ-उताराचे वातावरण असतानाच काही कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजीही दिसून आली. अशीच एक कंपनी म्हणजे, AGS ट्रांझॅक्ट टेक्नॉलॉजीज लिमिटेड. या कंपनीचा शेअर शुक्रवारी 13 टक्क्यांची वधारत 69.79 रुपयांवर पोहोचला आहे. खरे तर, एका पॉझिटिव्ह बातमीने या शेअरच्या किंमतीत तेजी दिसून आली आहे.

खरे तर, या कंपनीला आपल्या बँकिंग ऑटोमेशन सोल्यूशन्स पोर्टफोलिओ अंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडियाला 1,350 एटीएमच्या पुरवठ्याची ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरअंतर्गत एसबीआय संपूर्ण भारतभरात 'AGS' ब्रँडेड एटीएम बसवणार आहे. "ही ऑर्डर बँकिंग ऑटोमेशन सॉल्यूशन्स सेगमेन्टसाठी आपली टॉपलाइन आणखी मजबूत करण्यास मदत करेल. या ऑर्डरमध्ये बँकिंग ऑटोमेशन सॉल्यूशन्सच्या विक्रीसह वार्षिक मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्टचाही समावेश आहे," असे कंपनीने शेअर बाजाराला सांगितले आहे. 

AGS ट्रांझॅक्ट टेक्नॉलॉजीजने पंजाब नॅशनल बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियासाठी 8,000 एटीएम/सीआरएमची ऑर्डरही पूर्ण केली आहे. 30 सप्टेंबर, 2023 पर्यंत कंपनीने देशातील 2,200 शहरे अथवा भागांत 77,658 एटीएम/सीआरएम बसविले अथवा त्याचे मेन्टेन्स केले आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारएटीएमगुंतवणूक