Join us

5 रुपयांच्या शेअरची कमाल, गुंतवणुकदारांना केलं मालामाल; या शेअरनं फक्त 4 महिन्यांत 1 लाखाचे केले 50 लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 3:16 PM

केवळ 4 महिन्यांतच गुंतवणूकदारांना 5000 टक्क्यांहून अधिकचा परतावा...

टेक्सटाइल इंडस्ट्रीशी संबंधित एका कंपनीच्या शेअरने गेल्या काही महिन्यांत छप्परफाड परतावा दिला आहे. बडोदा रेयॉन कॉरपोरेशन (Baroda Rayon Corporation) असे या कंपनीचे नाव आहे. या कंपनीच्या शेअरने गेल्या केवळ 4 महिन्यांतच गुंतवणूकदारांना 5000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. या कालावधीत बडोदा रेयॉन कॉरपोरेशनचा शेअर 5 रुपयांनी वाढून 250 रुपयांवर पोहोचला आहे. या कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांतील हाय लेव्हल 345 रुपये आहे. तसेच, बडोदा रेयॉन कॉरपोरेशनच्या शेअर्सचा 52 आठवड्यांतील लो लेव्हल 4.42 रुपये आहे.

1 लाख रुपयांचे केले 52 लाख रुपये -बडोदा रेयॉन कॉर्पोरेशनचा शेअर 3 जून 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेन्जवर (BSE) 5.11 रुपयांवर होता. तो आज 20 ऑक्टोबर 2022 रोजी बीएसईवर 268.05 रुपयांवर आहे. जर एखाद्या व्यक्तीने 3 जून 2022 रोजी बडोदा रेयॉन कॉर्पोरेशनच्या शेयर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज तिचे 52.45 लाख रुपये झाले असते. या कंपनीचे मार्केट कॅप जवळपास 615 कोटी रुपये आहे. 

कंपनीच्या शेअरनं दिला तब्बल 5600 टक्क्यांचा परतावा - बडोदा रेयॉन कॉरपोरेशनच्या (Baroda Rayon Corporation) शेअरने जवळपास साडे 4 महिन्यांत गुंतवणूकदारांना तब्बल 5670 ट्क्यांचा परदावा दिला आहे. कंपनीचे शेअर 1 जून 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेन्जवर 4.64 रुपयांच्या पातळीवर होते. ते आज (20 ऑक्टोबर 2022) 268.05 रुपयांवर आहेत. बडोदा रेयॉन कॉरपोरेशनच्या शेअरमध्ये गेल्या एका महिन्यात जवळपास 87 टक्क्यंची तेजी दिसून आली आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक