Lokmat Money >शेअर बाजार > दोन दिवसांच्या तेजीला ब्रेक, सेन्सेक्स 187 अंकांनी घसरला; बँकिंग शेअर्सचा बाजारावर परिणाम

दोन दिवसांच्या तेजीला ब्रेक, सेन्सेक्स 187 अंकांनी घसरला; बँकिंग शेअर्सचा बाजारावर परिणाम

Closing Bell Today: या घसरणीचा गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 04:29 PM2023-11-17T16:29:42+5:302023-11-17T16:30:16+5:30

Closing Bell Today: या घसरणीचा गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला.

Share Market Stock Market Closing Bell Today Sensex Trades 187 Points Lower Nifty Below 19,750 | दोन दिवसांच्या तेजीला ब्रेक, सेन्सेक्स 187 अंकांनी घसरला; बँकिंग शेअर्सचा बाजारावर परिणाम

दोन दिवसांच्या तेजीला ब्रेक, सेन्सेक्स 187 अंकांनी घसरला; बँकिंग शेअर्सचा बाजारावर परिणाम

Closing Bell Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी घसरणीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 187 अंकांच्या घसरणीसह 65794 वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 33 अंकांच्या घसरणीसह 19731 वर बंद झाला. 

शुक्रवारी निफ्टी मिडकॅप 100 ने 0.15 टक्क्यांची किंचित वाढ नोंदवली तर बीएसई स्मॉल कॅपने 0.36% ची वाढ नोंदवली. निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांकातही डाउनफॉल नोंदवला गेला. शेअर बाजारातील सर्वाधिक लाभधारकांमध्ये एसबीआय लाइफ, एचडीएफसी लाइफ, अपोलो हॉस्पिटल आणि लार्सन अँड टुब्रोचे शेअर्स होते, तर सर्वाधिक नुकसान झालेल्यांमध्ये एसबीआय, अॅक्सिस बँक, ओएनजीसी आणि बीपीसीएलचे शेअर्स होते.

शुक्रवारी गौतम अदानी समूहाच्या नऊ पैकी 6 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट नोंदवली गेली. अदानी एंटरप्रायझेस, एसीसी लिमिटेड आणि अंबुजा सिमेंटचे शेअर्स किरकोळ वाढले तर अदानी टोटल गॅस, अदानी पोर्ट्स, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी विल्मार, अदानी पॉवर आणि एनडीटीव्ही यांचे शेअर्स खाली आले. 

मल्टीबॅगर रिटर्न्स देणार्‍या शेअर्सबद्दल बोलायचे झाले तर, गती लिमिटेड, स्टोव्ह क्राफ्ट आणि जिओ फायनान्शिअलच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. अश्निषा इंडस्ट्रीज, आयआरसीटीसी, मुथूट फायनान्स, मारुती सुझुकी यांचे शेअर्स तेजीत होते, तर रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, पतंजली फूड्स, फेडरल बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक आणि एसबीआय कार्ड यांचे शेअर्सही किरकोळ खाली आले होते. 

Web Title: Share Market Stock Market Closing Bell Today Sensex Trades 187 Points Lower Nifty Below 19,750

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.