Join us  

Stock Markets Crash: शेअर बाजाराला मोठा ब्रेक! सेन्सेक्स १२०० अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 3:49 PM

Stock Market Crash : गेल्या २ आठवड्यांपासून तेजीत असलेला भारतीय शेअर बाजाराला आज मोठा धक्का बसला. सन्सेक्स तब्बल १२०० अंकांनी घसरला.

Stock Market Crash : गेल्या २ आठवड्यांपासून तेजीत असलेल्या भारतीय शेअर बाजाराला आज मोठा ब्रेक लागला. सोमवारी (३० सप्टेंबर) भारतीय शेअर बाजारात मंदीची सुरुवात झाल्यानंतर बाजारात सातत्याने घसरण सुरू होती. सेन्सेक्स ८५,००० च्या खाली आणि निफ्टी २६,००० च्या खाली गेला होता. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही घसरत होते. सुरुवातीला सेन्सेक्स ३६३ अंकांनी घसरुन ८५,२०८ वर उघडला. निफ्टी ११७ अंकांनी घसरून २६,०६१ वर तर बँक निफ्टी २७८ अंकांनी घसरून ५३,५५६ वर उघडला. इतकी मोठी घसरण अचानक का झाली? चला यामागील ५ कारणे समजून घेऊ.

आज सर्वात मोठी घसरण बँकिंग, ऑटो आणि एनर्जी शेअर्समध्ये दिसून आली. हिरोमोटो कॉर्प, ट्रेंट, ॲक्सिस बँक, बजाज ऑटो, आयसीआयसीआय बँक आणि महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स आज NSE वर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. बाजारातील या घसरणीमागे अनेक कारणे आहेत. यामध्ये परकीय गुंतवणूकदारांसह किरकोळ गुंतवणूकदारांची मोठी विक्री आणि मध्यपूर्वेतील वाढता तणाव हे प्रमुख आहेत.

परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीविदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) केलेल्या विक्रीमुळे बाजारावर मोठा दबाव निर्माण झाला. शुक्रवार, २७ सप्टेंबर रोजी, FII ने १ हजार २०९ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली होती. आजची विक्री आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे व्हीके विजयकुमार यांच्या मते, ही विक्री चीनी शेअर्सच्या चांगल्या कामगिरीमुळे होत आहे. सप्टेंबरमध्ये हँग सेंग इंडेक्स सुमारे १८% वाढला आहे.

किरकोळ गुंतवणूकदार नेट सेलरसप्टेंबरमध्ये भारतीय शेअर बाजारात ७,५०० कोटी रुपयांचे शेअर्स विकून किरकोळ गुंतवणूकदार ६ महिन्यांत पहिल्यांदाच नेट सेलर बनले आहेत. मार्च २०२४ नंतरची ही सर्वात मोठी विक्री आहे. छोट्या गुंतवणूकदारांनी केलेल्या प्रॉफिट बुकींगमुळे शेअर बाजारातही मोठी घसरण झाली आहे.

मध्यपूर्वेत वाढता तणावहिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाह यांची हत्या आणि इराणच्या वरिष्ठ कमांडरच्या मृत्यूनंतर मध्यपूर्वेत तणाव शिगेला पोहोचला आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार सावधगिरीचा मार्ग अवलंबत आहेत. मात्र, मध्यपूर्वेतील तणावामुळे भारतीय बाजारपेठेत अल्पकालीन घसरणच दिसून येईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

कमकुवत जागतिक संकेतआशियाई बाजारातील कमजोरीमुळे भारतीय शेअर बाजारही दबावाखाली आले. जपानचा Nikkei-२२५ निर्देशांक ५% पेक्षा जास्त घसरला. कोरियाचे बाजारही कमजोर होते. याशिवाय अमेरिकेच्या नॅस्डॅक आणि एस अँड पी ५०० निर्देशांकातही घसरण झाली.

उच्च मूल्यांकनबाजार विश्लेषक काही काळापासून बाजाराच्या उच्च मूल्यांकनाबद्दल चिंता व्यक्त करत आहेत, त्यामुळे नवीन गुंतवणूकदार सावध झाले आहेत. अनेक विभागांमध्ये प्रॉफिट बुकींग होत आहे. भारताच्या वाढीच्या क्षमतेमुळे परदेशी गुंतवणूकदारांचे लक्ष लवकरच भारतीय बाजाराकडे वळेल, असा विश्वास फंड व्यवस्थापक संदीप अग्रवाल यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक