Lokmat Money >शेअर बाजार > ‘बुलेट ट्रेन’च्या वेगानं वाढतोय रेल्वेच्या या कंपनीचा शेअर, गुंतवणुकदारांना करतोय मालामाल 

‘बुलेट ट्रेन’च्या वेगानं वाढतोय रेल्वेच्या या कंपनीचा शेअर, गुंतवणुकदारांना करतोय मालामाल 

आता या कंपनीच्या शेअरची किंमत विक्रमी 358 रुपयांवर पोहोचली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 04:58 PM2022-10-03T16:58:11+5:302022-10-03T17:02:01+5:30

आता या कंपनीच्या शेअरची किंमत विक्रमी 358 रुपयांवर पोहोचली आहे.

Share market Stock market indian railways psu stock surges 16 percent in 5 session share climbs record high | ‘बुलेट ट्रेन’च्या वेगानं वाढतोय रेल्वेच्या या कंपनीचा शेअर, गुंतवणुकदारांना करतोय मालामाल 

‘बुलेट ट्रेन’च्या वेगानं वाढतोय रेल्वेच्या या कंपनीचा शेअर, गुंतवणुकदारांना करतोय मालामाल 

इंडियन रेल्वेच्या (Indian Railways) मालिकीची कंपनी Rites Ltd च्या शेअर्समध्ये विक्रमी तेजी दिसून येत आहे. गेल्या काही सत्रांत या कंपनीचे शेअर ‘बुलेट ट्रेन’च्या (Bullet Train) वेगाप्रममाणे वाढत आहेत. आठवड्याच्या पहिल्याच ट्रेडिंग सेशनमध्ये कंपनीच्या शेअरने 6 टक्क्यांची उसळी घेतली. या तेजीनंतर, कंपनीच्या शेअरने बीएसईवरील आपले सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. आता कंपनीच्या शेअरची किंमत विक्रमी 358 रुपयांवर पोहोचली आहे.

गेल्या काही सत्रांत दिसून आली तेजी -
गेल्या काही सत्रांपासूनच राइट्स लिमिटेडच्या (Rites Ltd) शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. या पीएसयू स्टॉकच्या (PSU Stock) किंमतीत गेल्या 5 सत्रांदरम्यान 16 टक्क्यांची उसळी दिसून आली आहे. तसेच, एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 24 टक्के तेजी आली आहे. 2022 मध्ये आतापर्यंत कंपनीच्या शेअर्सचा परफॉर्मन्स चांगला राहिला आहे. या वर्षात कंपनीच्या शेअने 26 टक्क्यांचा परतावा दिला आहे. तर गेल्या 6 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत 30 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. कंपनीच्या 52 आठवड्यांतील लो लेव्हल 226.20 रुपये एवढा आहे.

असा आहे तिमाहीतील परफॉर्मन्स -  
जून 2022 च्या तिमाहीत कंपनीचा नेट प्रॉफिट 86 टक्क्यांनी वाढून 145 कोटी रुपयांवर पोहोचा आहे. तसेच, चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत कंपनीचा एकूण रेव्हेन्यू 605 कोटी रुपयांवर होता. तसेच, गेल्या आर्धिक वर्षातील पहिल्या तिमाहीत कंपनीचा रेव्हेन्यू 355 कोटी रुपये होता. कंपनीला मार्च 2022 मध्ये 4939 कोटी रुपयांची ऑर्डरमिळाली होती. तिमाहितील चांगल्या परफॉर्मन्समुळे या स्टॉकवर लोकांचा विश्वास काय आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: Share market Stock market indian railways psu stock surges 16 percent in 5 session share climbs record high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.