Lokmat Money >शेअर बाजार > ₹23 रुपयांचा शेअर सुटलाय सुसाट, आली 'तुफान' तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुबंड, 220% नं वधारला

₹23 रुपयांचा शेअर सुटलाय सुसाट, आली 'तुफान' तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुबंड, 220% नं वधारला

कंपनीचे मार्केट कॅप ₹1,651 कोटी एवढे आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 07:57 PM2024-06-26T19:57:33+5:302024-06-26T19:58:39+5:30

कंपनीचे मार्केट कॅप ₹1,651 कोटी एवढे आहे.

Share market stock market mic electronics ltd share surges 5 percent upper circuit stock delivered huge return 220 percent | ₹23 रुपयांचा शेअर सुटलाय सुसाट, आली 'तुफान' तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुबंड, 220% नं वधारला

₹23 रुपयांचा शेअर सुटलाय सुसाट, आली 'तुफान' तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुबंड, 220% नं वधारला

शेअर बाजारातील मल्टीबॅगर स्टॉक एमआयसी इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअरमध्ये (MIC Electronics Ltd) जबरदस्त तेजी बघायला मिळत आहे. आज बुधवारीही या शेअरमध्ये 5% चे अप्पर सर्किट लागले आणि तो 74.66 रुपयांवर पोहोचला. या शेअरने गेल्या एका वर्षात 220% पर्यंतचा परतावा दिला आहे. या कालावधीत याची किंमतत 23 रुपयांवरून सध्याच्या पातळीवर पोहोचली आहे. गेल्या सहा महिन्यांचा विचार करता, हा शेअर 120% ने वधारला आहे. या कालावधीत या शेअरने 33 रुपयांवरून सध्याच्या पातळीपर्यंत झेप घेतली आहे. कंपनीचे मार्केट कॅप ₹1,651 कोटी एवढे आहे.

असं आहे तेजीचं कारण - 
एक्सचेन्ज फायलिंगमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला पश्चिम रेल्वेच्या रतलाम मंडळाकडून एक कंप्लीशन सर्टिफिकेट मिळाले आहे. ज्याकडे हिच्या यशस्वी प्रकल्प आणि भविष्यातील विकासाच्या शक्यतेचे सर्टिफिकेट म्हणून बघितले जात आहे. गेल्या एका महिन्यात एनएसईवर एमआयसी इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअरची किंमत ₹51.45 वरून वाढून ₹74.66 प्रति शेअरवर पोहोचली. 

गेल्या सहा मिहन्यांत हा शेअर 33.90 वरून ₹74.60 प्रति शेअरवर पोहोचला आहे. यात साधारणपणे 120 टक्क्यांची तेजी नोंदवली गेली. एका वर्षात, मल्टीबॅगर स्टॉक 220 टक्क्यांहून अधिकने वधारला आहे. तर गेल्या तीन वर्षांत, या स्मॉल-कॅप स्टॉकने 315 टक्क्यांचा परतावा दिला आहे. हा स्टॉक बीएसई आणि एनएसईवर उपलब्ध आहे. मेनबोर्ड स्टॉकचे मार्केट कॅप ₹1,651 कोटी एवढे आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

Web Title: Share market stock market mic electronics ltd share surges 5 percent upper circuit stock delivered huge return 220 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.