Join us

हा आहे चांदीचे सोने बनवणारा स्टॉक, गुंतवणुकदारांना फक्त 15 महिन्यांत मिळाला 1000% परतावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 12:36 AM

या शेअरने गेल्या पाच दिवसांत जवळापास 21 टक्क्यांचा परतावा दिला आहे...

भारतीय शेअर बाजारात (Share Bazar) गेल्या काही महिन्यांत अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली आहे. यातच, एप्रिल-जून तिमाहीत (Q1 Result) कंपन्यांचे चांगले प्रदर्शन होते. हेही या शेअर्सच्या वाढीमागील मोठे कारण आहे. यातच ब्राइटकॉम ग्रुपच्या (Brightcom Group) कंपनीनेही चांगला नफा कमावला आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा रिझल्ट आल्यानंतर, ब्राइटकॉम ग्रुपच्या शेअरने मार्केटमध्ये जबरदस्त स्पीड घेतली आहे.

गेल्या 5 दिवसांत दिला जबरदस्त परतावा -   ब्राइटकॉम ग्रुपच्या शेअरने गेल्या पाच दिवसांत जवळापास 21 टक्क्यांचा परतावा दिला आहे. यापूर्वी काही महिन्यांत कंपनीची स्थिती फारशी चांगली नव्हती. कंपनीच्या शेअरची किंमत 7 एप्रिल 2022 रोजी 108 रुपयांवर होती. गेल्या सहा महिन्यांत ब्राइटकॉम ग्रुपच्या शेअरचा भाव 45 टक्क्यांपर्यंत खाली कोसळा आहे. त्यावेळी रशिया-युक्रेन युद्धामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, आता कंपनीच्या शेअर प्राइसमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. 

या लोकांना मिळाला जबरदस्त परतावा -  हे वर्ष कंपनीच्या शेअरधारकांसाठी फारसे चांगले राहिले नाही, कारण शेअर प्राइसमध्ये मोठी घसरण दिसून आली. मात्र, ज्या लोकांनी या शेअर्समध्ये लॉन्‍ग टर्म इन्व्हेस्टमेन्ट केली त्यांना या शेअरमधून जबरद्सत पैसा मिळाला आहे. कंपनीचा शेअर गेल्या एका वर्षात 165 टक्क्यांनी वधारला आहे. कंपनीचा शेअर 17.58 रुपयांनी वाढून 46.50 रुपयांवर पोहोचला आहे. 

तसेच, गेल्या 15 महिन्यांत हा शेअर 4 रुपयांवरून 46 रुपयांवर पोहोचला आहे. अर्थात 15 महिन्यात गुंतवणूकदारांना तब्बल 1000 ट्क्यांचा परतावा मिळाला आहे. दोन वर्षांपूर्वी ज्या लोकांनी या शेअरमध्ये गुंतवणूक केली असेल, त्यांना आता तब्बल 1200 टक्क्यांचा परतावा मिळाला असेल.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक