Join us  

7 रुपयांवर होता शेअर; कंपनीनं एका वर्षात दिला 363 टक्क्यांचा परतावा; गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 4:22 PM

सुझलॉन एनर्जीच्या शेअरने 52 आठवड्यांतील नवा उच्चांक गाठला आहे. एप्रिल 2015 नंतर कंपनीचा शेअर आपल्या उच्चांकावर पोहोचला आहे.

शेअर बाजारात पवन ऊर्जा क्षेत्रातील कंपनी सुझलॉन एनर्जीचा (Suzlon Energy) शेअर जबरदस्त तेजीत आहे. या शेअरने 52 आठवड्यांतील नवा उच्चांक गाठला आहे. सुझलॉन एनर्जीच्या शेअरने 52 आठवड्यांतील नवा उच्चांक गाठला आहे. एप्रिल 2015 नंतर कंपनीचा शेअर आपल्या उच्चांकावर पोहोचला आहे. हा शेअर गेल्या एका वर्षांत 7 रुपयांवरून 31 रुपयांवर पोहोचला आहे.

एका वर्षात 363% चा परतावा -सुझलॉन एनर्जीचा शेअर 14 ऑक्टोबर 2022 रोजी 6.70 रुपयांवर पोहोचला आहे. 18 ऑक्टोबर 2023 रोजी 31.06 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या एका वर्षात सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये 363 टक्क्यांनी वधारला आहे. सुझलॉन एनर्जीचा शेअर या वर्षात आतापर्यंत जवळपास 190 टक्क्यांनी वधारला आहे. तर गेल्या 6 महिन्यांत या शेअरने 289 टक्क्यांचा परतावा दिला आहे. या कंपनीचा शेअर 19 एप्रिल 2023 रोजी 7.98 रुपयांवर होता, तो 18 ऑक्टोबर 2023 रोजी 31.06 रुपयांवर पोहोचला. सुझलॉन एनर्जीच्या शेअरचा 52 आठवड्यांतील निचांक 6.96 रुपये एवढा आहे.

3 वर्षांत शेअरमध्ये आली 1117% तेजी -सुझलॉन एनर्जीच्या शेअरमध्ये गेल्या 3 वर्षांत जबरदस्त तेजी आली आहे. कंपनीचा शेअर 16 ऑक्टोबर 2020 रोजी 2.55 रुपयांवर होता. तो 18 ऑक्टोबर 2023 रोजी 31.06 रुपयांवर पोहोचला. या गेल्या 3 वर्षांत कंपनीच्या शेअरने 1117 टक्क्यांचा परतावा दिला आहे. 

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक