Join us  

टाटा समूहाच्या शेअरमध्ये तुफान तेजी, गुंतवणूकदारांना लागली लॉटरी; 1 लाखाचे झाले 83 लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 11:14 PM

हा शेअर 90 रुपयांवरून 7500 रुपयांवर पोहोचले आहेत...

टाटा समूहाची कंपनी असलेल्या टाटा एलेक्सीच्या शेअरमध्ये गेल्या काही दिसवसांत जबरदस्त तेजी आली आहे. टाटा एलेक्सीचे शेअर 90 रुपयांवरून 7500 रुपयांवर पोहोचले आहेत. या कालावधीत या मल्टीबॅगर कंपनीने 8300 टक्क्यांचा परतावा दिला आहे. टाटा एलेक्सीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांतील उच्चांक 10760.40 रुपये, तर निचांक 5708.10 रुपये आहे.

मल्टीबॅगर शेअरने 1 लाखाचे केले 83 लाख रुपये -टाटा एलेक्सीचा शेअर 28 जून 2013 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेन्ज वर 90.40 रुपयांवर होता. तो 28 जून 2023 रोजी बीएसईवर 7600 रुपयांवर पोहोचला. टाटा एलेक्सीच्या शेअरने या काळात 8307 टक्क्यांचा परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 10 वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती आतापर्यंत कायम ठेवली असती, तर आता त्याचे 83.79 लाख रुपये झाले असते.

3 वर्षांत जबरदस्त परतावा - टाटा एलेक्सीच्या शेअरने गेल्या 3 वर्षांत जबरदस्त परतावा दिला आहे. कंपनीचा शेअर 26 जून 2020 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेन्जवर 900.20 रुपयांवर होता. तो 28 जून 2023 रोजी बीएसईवर 7600 रुपयांवर बंद झाला. टाटा एलेक्सीच्या शेअरने गेल्या 3 वर्षांत 745 टक्क्यांचा परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 3 वर्षांपूर्वी टाटा एलेक्सीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती आतापर्यंत कायम ठेवली असती, तर आता त्याचे 8.44 लाख रुपये झाले असते.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारटाटागुंतवणूक