भारतात इनफ्लाइट कनेक्टिव्हिटी ऑफर करण्यासाठी कंपनीकडून Intelsat सोबत भागीदारी करण्यात आली आहे. यानंतर शुक्रवारी नेल्कोचे शेअर (Nelco share price) BSE वर 10 टक्के वरच्या सर्किटवर 856.65 रुपयांवर ट्रेड करत आहेत. हा शेअर 19 ऑक्टोबर, 2021 रोजी 52 आठवड्यांतील उच्च स्थरावर 968.55 रुपयांवर पोहोचला होता.
काय आहे डील? -जगातील सर्वात मोठे इंटेग्रेटेड सॅटेलाइट आणि स्थलीय नेटवर्कपैकी एक आणि इनफ्लाइट कनेक्टिव्हिटीचे (आयएफसी) अग्रणी प्रोव्हायडर, इंटेलसॅटने गुरुवारी भारतातील मुख्य कंपनी नेल्कोसोबत एक डील केली आहे. या डीलनुसार, कंपनीला भारतात अपली इन-फ्लाईट कनेक्टिव्हिटी सेवा सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. नेल्को 128 अब्ज डॉलरच्या टाटा समूहाचा एक भागा आहे. जो भारतातील एक अग्रगण्य उपग्रह संप्रेषण सेवा प्रोव्हायडर आहे. याच्या माध्यमाने संपूर्ण देशात इंडस्ट्रीज, एयरो आयएफसी आणि समुद्र अत्यंत विश्वसनीय डेटा कनेक्टिव्हिटी प्रदान करतो.
पाच दिवसांत 20 टक्क्यांहून अधिकची वाढ -चालू आठवड्यात एसअँडपी बीएसई सेंसेक्स 1.6 टक्क्यांनी घसरला. यातुलनेत नेल्कोचा बाजार भाव 28 टक्क्यांनी वधारला आहे. गेल्या तीन महिन्यात हा 52 टक्यांनी वधाला आहे. मात्र, बेंचमार्क इंडेक्समध्ये 10 टक्यांची वाढ झाली आहे. गेल्या पाच दिवसांत टाटा ग्रुपचा हा शेअर 20.20% वाढला आहे. तर, गेल्या एक महिन्यात हा शेअर 32.55 टक्यांनी वर गेला आहे.