गेल्या वर्षभरापासून टाटा समूहाच्या टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रीचे वातावरण आहे. मात्र, आता कंपनीच्या शेअरमध्ये तेजीची शक्यता वर्तवली जात आहे. ग्लोबल ब्रोकरेज जेपी मॉर्गन यांनी, सध्याच्या पातळीवर टायटनच्या शेअरची खरेदी वाढू शकते, असा अंदाज वर्तवला आहे. तसेच, मॉर्गन यांच्या रिपोर्टनुसार, हा स्टॉक मार्च 2024 पर्यंत ₹3000 पर्यंत जाऊ शकतो.
सध्याची किंमत -
आठवड्यातील व्यवसायाच्या शेवट्या दिवशी टायटनच्या शेअरची किंमत 2470 रुपयांवर होती. एक दिवसा आधीच्या तुलनेत या शेअरमध्ये 0.50 टक्क्यांपर्यंतची तेजी होती. ब्रोकरेजच्या अंदाजाचा विचार करता, शेअरमध्ये 20 टक्क्यांहून अधिक तेजीची आशा आहे.
काय म्हणत आहेत ब्रोकरेज -
आम्हाला आशा आहे, मार्जिन 12-13 टक्क्यांवर स्थिर राहील. सध्याच्या वातावरणात, तुलनेने कमी नकारात्मक जोखमीसह कमाईत चांगली वाढ होण्याची शक्यता आहे, असे जेपी मॉर्गन यांच्या रिपोर्टमध्ये म्हणण्यात आले आहे. याच बरोबर, आनंद राठीचे गणेश डोंगरे म्हणाले, चार्ट पॅटर्नवर टायटनच्या शेअरची किंमत ₹2300 ते ₹2600 प्रति शेअर रेन्जमध्ये आहे. तसेच, 2600 हजारांच्या पुढे गेल्यास शेअर रॉकेट स्पीड घेऊ शकतो. हा स्टॉक ज्यांच्याकडे आहे, ते लोक ₹2300 प्रति शेअरवर हा स्टॉप लॉसससह होल्ड करू शकतात. शेअर बाजारातील सध्याची स्थिती पाहता, हा शेअर ₹2300 प्रति शेअरच्या खाली गेल्यास ₹2000 पुढील चांगला आधार राहील आणि कुणीही टाटा समूहाचा हा स्टॉक खरेदी करू शकेल." ब्रोकरेजने लॉन्ग होल्डचा सल्ला दिला आहे.
रेखा झुनझुनवालांचीही हिस्सेदारी -
या शेअरमध्ये बिग बुल दिवंगत राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनीही मोठी गुंतवणूक केली आहे. डिसेंबर तिमाही पॅटर्न पाहता, टायटन कंपनीमध्ये रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 4,58,95,970 शेअर आहेत, जे कंपनीच्या एकूण भाग भांडवलाच्या 5.17 टक्के आहे.