Tata Group Stocks : सध्या शेअर बाजार पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळत आहे. मात्र, शेअर बाजार कोसळत असतानाच खरी गुंतवणुकीची संधी असते, असं बाजारातील तज्ज्ञ सांगतात. जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल. तर टाटा ग्रुपच्या शेअर्सपेक्षा चांगलं काय असू शकते. वास्तविक, टाटा समूहाचे अनेक शेअर्स त्यांच्या ५२ आठवड्यांच्या उच्च पातळीपेक्षा ३४ टक्क्यांपर्यंत खाली व्यवहार करत आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बाजारातील घसरणीमुळे टाटा मोटर्स, टाटा कंझ्युमर, टाटा स्टील, टाटा केमिकल आणि इतर समूह कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. अशा स्थितीत हे शेअर्स स्वस्तात खरेदी करता येऊ शकतात.
टाटा मोटर्स : देशातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्सचे शेअर्स त्यांच्या ११७९ रुपयांच्या उच्च पातळीवरून ७७४ रुपयांच्या पातळीवर घसरले आहेत. या स्थितीत ही ३४ टक्क्यांची घसरण आहे.
Tata Alexi : टाटा समूहाचा हा शेअर ९०८० रुपयांच्या उच्चांकावरून ६३७४ रुपयांच्या पातळीवर घसरला आहे. या शेअर्समध्ये सुमारे ३२ टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.
Tata Consumer : FMCG क्षेत्रातील या टाटा ग्रुप कंपनीचे शेअर्स त्यांच्या उच्चांकावरून २६ टक्क्यांनी घसरले आहेत. टाटा कंझ्युमरच्या शेअर्सने १२४७ रुपयांचा उच्चांक गाठला होता. मात्र, आता त्याची किंमत ९२५ रुपये आहे.
टाटा केमिकल : टाटा समूहाची ही कंपनी रासायनिक क्षेत्रातील एक महत्त्वाचे नाव आहे. टाटा केमिकलचे शेअर्सही त्यांच्या उच्चांकावरून २२ टक्क्यांनी घसरले आहेत. हा शेअर १२४७ रुपयांच्या उच्च पातळीवरून घसरला आहे. सध्या तो १०५८ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.
टाटा स्टील : भारतातील पोलाद क्षेत्रातील दिग्गज टाटा स्टीलचे शेअर्सही घसरणीनंतर मोठ्या सवलतीत उपलब्ध आहेत. टाटा स्टीलचे शेअर्स १७० रुपयांच्या पातळीवरून घसरले असून ते १३८ रुपयांवर व्यवहार करत आहेत.
(डिस्क्लेमर : यामध्ये केवळ शेअर्सबाबत माहिती देण्यात आली आहे, हा गुंतवणूक सल्ला नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करणे बाजारातील जोखमीच्या अधीन असल्याने, कृपया गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)