शेअर बाजारात ऐतिहासिक तेजी दिसत असतानाच टाटा समूहाच्या शेअर्सचीही जबरदस्त खरेदी झाल्याचे दिसून आले आहे. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी, अर्थात शुक्रवारी, टाटा समूहाची कंपनी असलेल्या टाटा स्टीलच्या शेअर्सने 3.50% ने उसळी गेतली आहे आणि तो 136.70 रुपयांवर पोहोचला आहे. हा शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक आहे. तर, गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात हा शेअर 101.60 रुपयांवर पोहोचला होता. हा या शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांक आहे. अशा प्रकारे गेल्या वर्षभरापासून हा शेअर याच पातळीवर रेंगाळत होता.
काय म्हणातायत तज्ज्ञ -
या शेअरवर शॉर्ट टर्मसाठी तज्ज्ञही बुलिश दिसत आहेत. ब्रोकरेज जेएम फायनान्शिअलने टाटा स्टीलच्या शेअरसाठी 150 रुपयांचे टार्गेट प्राइस देत, खरेदीचाही सल्ला दिला आहे. अर्थात, टाटा स्टीलचा शेअर 150 रुपयांच्या पातळीपर्यंत पोहोचण्याचा अंदाज लावला जाऊ शकतो. या शेअरचे मार्केट कॅपिटल 1,67,734.47 कोटी रुपये एवढे आहे.
10 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक -
टाटा स्टीलने लंडनमध्ये सस्टिनेबल डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंगमध्ये इनोव्हेशन सेंटर स्थापन करण्यासाठी इम्पीरियल कॉलेज लंडनसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. हे केंद्र धोरणात्मक क्षेत्रांत तंत्रज्ञानाचा विकास आणि तैनातीत गती आण्यासाठी, प्रतिभेला आकर्षित करण्यासाठी आणि उद्योग-शैक्षणिक सहयोगी इकोसिस्टम तंत्र मजबूत करण्यास सक्षम करेल. हे उद्दिष्ट पुढे नेण्यासाठी टाटा स्टील चार वर्षांत या केंद्रात 10 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करणार आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)