आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी शेअर बाजार तेजीसह बंद झाला. BSE चा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 319.90 अंकांनी किंवा 0.53 टक्क्यांनी वधारून 60,941.67 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे, NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 90.90 अंकांनी किंवा 0.50 टक्क्यांनी मजबूत होऊन 18,118.55 च्या पातळीवर बंद झाला.
बीएसई मिडकॅप निर्देशांक दीड टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. तर दुसरीकडे बीएसई स्मॉलकॅपमध्ये 0.3 टक्क्यांची घसरण दिसून आली. सेक्टरल इंडेक्सबद्दल सांगायचं झालं तर ऑटो, बँकिंग, एफएमसीजी आणि हेल्थकेअर समभागांच्या निर्देशांकांमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. या तेजीमुळे आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी सुमारे 54 हजार कोटी रुपयांची कमाई केली आहे.
गुंतवणूकदारांनी 54 हजार कोटी कमावले
BSE वर सूचीबद्ध केलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल सोमवारी वाढून 280.81 लाख कोटी रुपये झाले. जे मागील ट्रेडिंग दिवशी म्हणजे शुक्रवारी 280.27 लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 54 हजार कोटी रुपयांनी वाढले.
या 5 शेअर्समध्ये तेजी
सेन्सेक्समधील 30 पैकी 21 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) च्या शेअर्समध्ये सर्वाधिक 1.289 टक्क्यांची वाढ झाली. यानंतर सन फार्मा, टीसीएस, इन्फोसिस आणि टेक महिंद्रा यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. यात जवळपास 0.56 टक्के ते 0.92 टक्क्यांची वाढ दिसून आली.
यात सर्वाधिक घसरण
दुसरीकडे सेन्सेक्समधील 9 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. अल्ट्राटेक सिमेंटमध्ये सर्वाधिक 4.62 टक्क्यांची घसरण झाली. याशिवाय एनटीपीसी (NTPC), टाटा स्टील (TATA Steel), लार्सन अँड टुब्रो (L&T) आणि रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) मध्ये 0.54 ते 0.89 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.
(टीप - या लेखात केवळ माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)