share market increase : शेअर बाजारात ऑक्टोबर २०२४ पासून सुरू असलेल्या घसरणीला अखेर ब्रेक लागला आहे. बाजारात फक्त चांगली रिकव्हरी होत नाही, तर अनेक स्टॉक्स रॉकेट झाले आहेत. सलग सातव्या दिवशी बाजारात प्रचंड वाढ झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हींमध्ये ही वाढ दिसून आली आहे. यासह २०२५ सालची भरपाई पूर्ण झाली आहे. परदेशी गुंतवणूकदार पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठेकडे आकर्षित झाले आहेत. त्यांनी खरेदी सुरू केल्याने बँकिंग शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. पण, शेअर बाजार अचानक रॉकेट होण्यामागे नेमकी काय कारणे आहेत?
विदेशी गुंतवणूकदारांचे पुनरागमन : गेल्या ५ महिन्यातील शेअर बाजारातील घसरणीला विदेशी गुंतवणूकदारांची विक्री कारणीभूत होती. मात्र, ही विक्री बंद करुन आता खरेदी सुरू झाली आहे. शुक्रवारी एफपीआयने ७,४७०.३६ कोटी रुपयांची निव्वळ खरेदी केली. मात्र, एफटीएससी निर्देशांकातील बदल हे त्याचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची भावना मजबूत झाली आहे. एफपीआयने विक्री थांबवली, महागाईत घट आणि भारतीय रुपया मजबूत झाल्यामुळे बाजारपेठेत आत्मविश्वास परत आला आहे.
वाचा - ३१२ अंकांच्या तेजीसह उघडला शेअर बाजार, रियल्टी क्षेत्रात जोरदार खरेदी; का रॉकेट झालंय मार्केट? पाहा
डॉलरच्या तुलनेत रुपयाची मजबूती : सोमवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ३७ पैशांनी वधारला आणि प्रति डॉलर ८५.६१ वर बंद झाला. देशांतर्गत बाजारात डॉलर आणि विदेशी गुंतवणुकीचा फायदा रुपयाला झाला आहे.
मजबूत ग्लोबल संकेत : शेअर बाजारातील प्रचंड तेजीचे तिसरे कारण म्हणजे जागतिक बाजारातील मजबूतीची चिन्हे. अमेरिकन शेअर बाजारातील मजबूती आणि भारतीय शेअर बाजारातील वाढीचा कालावधीही सुरूच आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संभाव्य टॅरिफबाबत निवडक दृष्टिकोन स्वीकारण्याचे संकेत दिले आहेत. डोनाल्ड ट्रम्प फक्त अशाच देशांना टार्गेट करू शकतात, ज्यांचे अमेरिकेशी व्यापार सरप्लस आहे.बँकिंग शेअर्समध्ये प्रचंड वाढ : शेअर बाजारातील वाढीचे चौथे कारण म्हणजे बँकिंग शेअर्समध्ये झालेली प्रचंड वाढ. सोमवारी व्यवहारादरम्यान निफ्टी बँक निर्देशांकाने १ हजार अंकांनी उसळी घेतली आणि ५१६३५ चा स्तर गाठला. तर कोटक महिंद्रा बँक, कॅनरा बँक आणि पंजाब नॅशनल बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक ३ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
गुंतवणूकदारांच्या भावनेत सुधारणा : समभागांच्या वाढीचे पाचवे आणि शेवटचे कारण म्हणजे गुंतवणूकदारांच्या भावना सुधारणे. गेल्या आठवड्यात सेन्सेक्समध्ये ३०७६.६ अंकांची नेत्रदीपक वाढ झाली होती. त्याच वेळी, निफ्टीनेही सुमारे ९५३.२ अंकांची म्हणजेच ४.२५ टक्क्यांनी झेप घेतली. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या भावनेत सुधारणा झाली आहे.