शेअर बाजारात अशाही काही कंपन्या आहेत, ज्या आपल्या गुंतवणूकदारांना वेळोवेळी बोनस देत असतात. संवर्धन मदरसन इंटरनॅशनल (Samvardhana Motherson International) ही कंपनीही अशाच काही कंपन्यांपैकी एक आहे, ज्यांनी गेल्या काही वर्षांत एकदा नव्हे तर अनेक वेळा आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स दिले आहेत. या कंपनीने 2012 पासून आतापर्यंत तब्बल 6 वेळा आपल्या भागधारकांना बोनस शेअर्स दिले आहेत. महत्वाचे म्हणजे, या कंपनीने आतापर्यंत आपल्या पोझिशनल गुंतवणूकदारांना तब्बल 102,525 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
संवर्धन मदरसन इंटरनॅशनलने 2012 पासून आतापर्यंत नेहमीच 1:2 या रेशो प्रमाणे शेअर्स दिले आहेत. कंपनीने या वर्षी ऑगस्ट महिन्यातही आपल्या योग्य शेअरधारकांना नफा वाटला आहे. यापूर्वी कंपनीने ऑक्टोबर 2018, जुलै 2017, जुलै 2015, डिसेंबर 2013 आणि ऑक्टोबर 2015 मध्येही आपल्या गुंतवणूकदारांना बोनस दिला होता. तसेच, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीने 17,712 कोटी रुपयांची कमाई केली होती. यातून कंपनीने 141 कोटी रुपये कमावले.
स्टॉक प्रदर्शन? -
ही कंपनी 1 जानेवारी 1999 रोजी NSE वर 0.12 रुपयांना लिस्ट झाली होती. तेव्हापासून कंपनीच्या शेअर्समध्ये बरेच चढ-उतार बघायला मिळाले. 5 वर्षांपूर्वी ज्या गुंतवणूकदारंनी या कंपनीच्या स्टॉकवर विश्वास ठेवला त्यांना सध्या सुकसानीचा सामना करावा लागत आहे. या काळात कंपनीच्या शेअर्समध्ये 42 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)