Join us

बाजारातील घसरणीला ब्रेक? सलग तिसऱ्या निफ्टी-सेन्सेक्समध्ये तेजी कायम; या सेक्टरमध्ये चांगली वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 16:39 IST

Nifty - Sensex Today: निफ्टी-सेन्सेक्स या आठवड्यात सलग तिसऱ्या सत्रात वाढीसह बंद करण्यात यशस्वी झाला. आज मिडकॅप निर्देशांकात गेल्या ९ महिन्यांतील सर्वात मोठी इंट्राडे वाढ दिसून आली.

Nifty - Sensex Today: ५ महिन्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा एकदा उत्साह पाहायला मिळत आहे. शेअर बाजाराने आज नफ्याची हॅट्ट्रिक साधली. बुधवारी तिसऱ्या दिवशी निफ्टी आणि सेन्सेक्स तेजीसह बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये जोरदार कामगिरी दिसून आली. आज मिडकॅप निर्देशांकात ९ महिन्यांतील सर्वात मोठी इंट्रा-डे वाढ दिसून आली. जर आपण क्षेत्रीय आघाडीवर नजर टाकली तर, डिफेन्स, रिअल्टी आणि सरकारी समभागांमध्ये खरेदी झाली. इन्फ्रा, धातू आणि तेल आणि वायू निर्देशांक वाढीने बंद झाले. बँकिंग आणि वाहन समभागातही खरेदी झाली. आयटी आणि एफएमसीजी शेअर्सवर दबाव होता.

बाजाराची स्थिती कशी होती?बुधवारी दिवसभराच्या कामकाजानंतर सेन्सेक्स १४८ अंकांच्या वाढीसह ७५,४४९ वर बंद झाला. निफ्टी ७३ अंकांच्या वाढीसह २२,९०८ वर बंद झाला. निफ्टी बँक ३३८ अंकांच्या वाढीसह ४९,७०३ च्या पातळीवर बंद झाला. त्याचवेळी निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक १,३०० अंकांच्या वाढीसह ५०,८१७ च्या पातळीवर बंद झाला.

झोमॅटोच्या शेअर्समध्ये मोठी वाढबुधवारी सेन्सेक्समधील ३० पैकी १७ कंपन्यांचे समभाग वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले. तर उर्वरित १३ कंपन्यांचे समभाग नुकसानासह लाल रंगात बंद झाले. दुसरीकडे, निफ्टी ५० मधील ५० कंपन्यांपैकी ३१ कंपन्यांचे समभाग वाढीसह हिरव्या चिन्हात बंद झाले आणि उर्वरित १९ कंपन्यांचे समभाग लाल चिन्हात बंद झाले. आज सेन्सेक्स कंपन्यांमध्ये टाटा स्टीलचे समभाग सर्वाधिक २.४९ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले, तर टेक महिंद्राचे समभाग सर्वाधिक २.२८ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

पॉवरग्रिड, अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर्समध्येही चांगली वाढआज उर्वरित सेन्सेक्स कंपन्यांमध्ये झोमॅटोचे शेअर्स २.४५ टक्के, पॉवर ग्रिड २.२२ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट २.०१ टक्के, इंडसइंड बँक १.५१ टक्के, लार्सन अँड टुब्रो १.३९ टक्के, स्टेट बँक ऑफ इंडिया १.०८ टक्के, अदानी पोर्ट्स १.०७ टक्के, एनटीपीसी १.०५ टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीज ०.८० टक्के, एचडीएफसी बँक ०.६३ टक्के, ॲक्सिस बँक ०.६१ टक्के, भारती एअरटेल ०.३३ टक्के, आयसीआयसीआय बँक ०.३२ टक्के, टाटा मोटर्स ०.२८ टक्के, एशियन पेंट्स ०.२८ टक्के आणि बजाज फायनान्स ०.१८ टक्के इतकी वाढ झाली.

आयटीसी, टीसीएसमध्ये मोठी घसरणदुसरीकडे आयटीसी १.५१ टक्के, टीसीएस १.३४ टक्के, इन्फोसिस १.२९ टक्के, सन फार्मा १.०७ टक्के, मारुती सुझुकी ०.९८ टक्के, नेस्ले इंडिया ०.७२ टक्के, एचसीएल टेकचे शेअर्स ०.६९ टक्के, कोटक महिंद्रा बँक ०.६७ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा ०.३३ टक्के, बजाज फिनसर्व्ह ०.२७ टक्के, टायटन ०.१९ टक्के आणि हिंदुस्थान युनिलिव्हर ०.१२ टक्के घसरले.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारनिर्देशांकनिफ्टी