Join us  

Share Market Today : सेन्सेक्स-निफ्टची तेजीनं सुरूवात; सिप्लाच्या शेअर्समध्ये तेजी, बजाज ऑटोमध्ये घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 10:03 AM

चालू आठवड्याच्या कामकाजाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी शेअर बाजाराचं कामकाज तेजीसह सुरू झालं.

चालू आठवड्याच्या कामकाजाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी शेअर बाजाराचं कामकाज तेजीसह सुरू झालं. प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सोमवारी शेअर बाजार बंद ठेवण्यात आला होता. परंतु मंगळवारी बीएसई सेन्सेक्स 552 अंकांच्या वाढीसह 71960 अंकांवर उघडला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 160 अंकांच्या वाढीसह 21732 अंकांवर उघडला. मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांकांमध्ये तेजी दिसून आली.शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारादरम्यान सिप्ला, आयसीआयसीआय बँक, अपोलो हॉस्पिटल आणि पॉवर ग्रिडच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर बजाज ऑटो, एशियन पेंट्स, एचडीएफसी बँक आणि ग्रासिम इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. अॅक्सिस बँक, रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशनसह 70 कंपन्यांचे डिसेंबर तिमाहीचे निकाल मंगळवारी जाहीर होणार आहेत. तर दुसरीकडे झी च्या शेअर्समध्ये 15-20 टक्क्यांपर्यंत घसरण होऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.अदानींच्या शेअर्समध्ये तेजीगौतम अदानी समूहाच्या 10 पैकी 6 लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स मंगळवारी घसरणीसह व्यवहार करत होते, तर अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स दोन टक्क्यांनी वाढले होते. अदानी टोटल गॅस 1.19 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत होता.शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणार्‍या शेअर्सबद्दल बोलायचं झालं तर, चेंबाऊंड केमिकल, साउथ इंडियन बँक, कजारिया सिरॅमिक्स, आयटीसी लिमिटेड, बीसीएल इंडस्ट्रीज, बंधन बँक, पंजाब नॅशनल बँक, एलआयसी, गेल आणि वोक्हार्ट यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात पेटीएम, डीपी वायर्स, इंडियन ऑइल आणि हजूर मल्टी प्रोजेक्ट्सच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजार