Lokmat Money >शेअर बाजार > ऑल टाइम हाय गाठल्यानंतर शेअर बाजार घसरला; गुंतवणूकदारांचे 2.03 लाख कोटी बुडाले

ऑल टाइम हाय गाठल्यानंतर शेअर बाजार घसरला; गुंतवणूकदारांचे 2.03 लाख कोटी बुडाले

Share Market Today: मिड कॅप स्मॉल कॅप शेअर्सने बिघडवला शेअर बाजाराचा मुड.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 04:37 PM2024-09-19T16:37:30+5:302024-09-19T16:37:47+5:30

Share Market Today: मिड कॅप स्मॉल कॅप शेअर्सने बिघडवला शेअर बाजाराचा मुड.

Share Market Today: Share market falls after hitting all-time high; 2.03 lakh crore of investors lost | ऑल टाइम हाय गाठल्यानंतर शेअर बाजार घसरला; गुंतवणूकदारांचे 2.03 लाख कोटी बुडाले

ऑल टाइम हाय गाठल्यानंतर शेअर बाजार घसरला; गुंतवणूकदारांचे 2.03 लाख कोटी बुडाले

Stock Market Closing On 19 September 2024: शेअर बाजारातगुंतवणूक करणाऱ्यांसाठी गुरुवारचे (19 सप्टेंबर) ट्रेडिंग सत्र चांगले ठरले. बीएसई सेन्सेक्सने 83,773 अंकांचा सर्वकालीन उच्चांक गाठला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टीने 25,611.95 अंकांचा सर्वकालीन उच्चांक गाठला. पण, आयटी, मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्समध्ये झालेल्या प्रॉफिट बुकिंगमुळे बाजार घसरला. व्यवहाराअंती बीएसई सेन्सेक्स 236.57 अंकांच्या उसळीसह 83,184.30 वर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 38.25 अंकांच्या उसळीसह 25,415.80 अंकांवर बंद झाला.

गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान
शेअर बाजार भलेही वाढीसह बंद झाला असेल, परंतु मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्सच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. बीएसईवर सूचीबद्ध शेअर्सचे मार्केट कॅप 465.69 लाख कोटी रुपयांवर आले, जे मागील सत्रात 467.72 लाख कोटी रुपयांवर होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे 2.03 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

वाढणारे आणि घसरणारे शेअर्स
आजच्या व्यवहारात बीएसईवर 4075 शेअर्सचे व्यवहार झाले, ज्यामध्ये 1249 शेअर्स वाढीसह बंद झाले, तर 2732 शेअर्स तोट्यात बंद झाले. BSE सेन्सेक्सच्या टॉप 30 शेअर्सपैकी 19 शेअर्स वाढीसह आणि 11 तोट्यासह बंद झाले. तर निफ्टी 50 पैकी 27 शेअर्स वाढीसह आणि 23 तोट्यासह बंद झाले. वाढणाऱ्या शेअर्समध्ये एनटीपीसी 2.45 टक्के, कोटक महिंद्रा बँक 1.82 टक्के, टायटन 1.56 टक्के, नेस्ले 1.51 टक्के, एचयूएल 1.21 टक्के, मारुती सुझुकी 0.99 टक्के, एचडीएफसी बँक 1.80 टक्के, एशियन पेंट्स 0.81 टक्के, भारती एअरटेल 0.75 टक्क्यांनी वाढले. तर अदानी पोर्ट्स 1.30 टक्के, एलअँडटी 1.26 टक्के, टीसीएस 1.14 टक्के, जेएसडब्ल्यू स्टील 0.91 टक्के, एचसीएल टेक 0.86 टक्के, टाटा स्टील 0.66 टक्के, टेक महिंद्रा 0.64 टक्के घसरून बंद झाले.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)

Web Title: Share Market Today: Share market falls after hitting all-time high; 2.03 lakh crore of investors lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.