Share Market News: शेअर बाजारात ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आता ट्रेड सेटलमेंटसाठी एकाही दिवसाची वाट पाहावी लागणार नाही. गुंतवणूकदारांनाशेअर बाजाराचं ट्रान्झॅक्शन सेटलमेंट पूर्ण करण्यासाठई आता पुढच्या ट्रेडिंग सेशनची वाट पाहावी लागणार नाही. दरम्यान, यानंतर आता तुम्ही शेअर विकताच त्याचे पैसे त्वरित तुमच्या डीमॅट अकाऊंटमध्ये येतील. नियामक शेअर बाजारात ट्रान्झॅक्शनची इन्स्टन्ट सेटलमेंट लागू करण्याच्या प्रक्रियेवर काम करत असल्याची माहिती बाजार नियामक सेबीच्या चेअरपर्सन माधबी बुच यांनी सोमवारी दिली.
शेअर बाजारात होणाऱ्या व्यवहारांचं सेटलमेंट आता त्वरित होईल आणि तो दिवस आता दूर नाही, असं बुच यांनी सांगितलं. सेबी शेअर बाजारात क्विक ट्रान्झॅक्शन सेटलमेंट म्हणजेच T+0 सिस्टम तयार करण्यासाठी सर्वांसोबत मिळून काम करत आहे. असं झाल्यास सेटलमेंटसाठी लागणारा वेळ कमी होईल. T+1 सेटलमेंट सिस्टम वापरणारा भारत जगातील पहिल्या देशांमध्ये सामील आहे. याचा अर्थ हा की एखाद्या गुंतवणूकदारानं शेअर विकत घेतले तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी ते त्याच्या डीमॅट खात्यात जमा केले जातात किंवा एखाद्या ग्राहकानं शेअर्स विकले तर दुसऱ्या दिवशी त्याचे पैसे गुंतवणूकदाराच्या खात्यात जमा केले जातात.
T+1 नं किती बचत?
T+1 सेटलमेंटचा वापर केल्यानं आणि ASBA (Application Supported by Blocked Amount) द्वारे गुंतवणूकदारांचे ३५०० रुपयांची वार्षिक बचत केली आहे. म्युच्युअल फंड्सच्या युनिट्सचं अलॉटमेंटही ग्राहकांना त्वरित होईल, असं बुच म्हणाल्या. मार्केट रेग्युलेशन,डेव्हलपमेंटवर आता लक्ष केंद्रित आहे. कॅपिटल मार्केटचं महत्त्वाचं ध्येय कॅपिटल ट्रान्सफॉर्मेशन आहे. जगातील बहुतांश विकसित देशांमध्ये T+2 सिस्टम लागू आहे. परंतु भारतात या वर्षी जानेवारी महिन्यापासून पूर्णपणे T+1 व्यवस्था लागू करण्यात आल्याचंही त्यांनी नमूद केलं.
सेबीसोबतच डीलिस्टिंगच्या नियमांचीही पडताळणी करत आहे. यासंदर्भात लवकरच कन्सल्टेशन पेपर जारी केले जातील, असं बुच म्हणाल्या. एक्सचेंजमधून कंपनीचे शेअर्स हटवण्याच्या प्रक्रियेला डीलिस्टिंग म्हटलं जातं. दरम्यान, सेबीच्या प्रमुखांनी यावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला.