Join us

कमाईची मोठी संधी; उद्यापासून 12 कंपन्यांचे IPO येणार, पाहा डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 8:56 PM

उद्यापासून 12 नवीन कंपन्यांचे IPO येणार असून, 8 कंपन्यांची लिस्‍टिंग होणार आहे.

Upcoming IPO: गेल्या काही काळापासून विविध IPO ने शेअर बाजारात धुमाकूळ घातला आहे. अनेक छोट्या-मोठ्या कंपन्यांच्या IPO ने शेअर बाजारातीलगुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. तुम्हीदेखील IPO मध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल, तर एक चांगली संधी आली आहे. सोमवार(दि.18 डिसेंबर)पासून अनेक IPO सबस्क्रिप्शनसाठी ओपन होणार आहेत. 

18 डिसेंबरपासून सुरू होणार्‍या धमाकेदार आठवड्यासाठी दलाल स्ट्रीट सज्ज आहे. उद्यापासून 12 नवीन IPO लॉन्च केले जाणार आहेत. या IPO च्या माध्यमातून कंपन्या 4,600 कोटी रुपये उभारतील. गेल्या आठवडाभरात कंपन्यांनी 4,000 कोटी रुपये उभे केले होते.

कोणत्या कंपन्यांचा IPO येणार आहे?

  1. मुथूट मायक्रोफिनचा आयपीओ 18 डिसेंबरला उघडेल आणि 20 डिसेंबरला बंद होईल. हा आयपीओ 760 कोटी रुपयांचा असून, याची बेस प्राइस 277 रुपये ते 291 रुपये प्रति शेअर आहे.
  2. सूरज इस्टेट डेव्हलपर्सचा IPO देखील 18 डिसेंबरला उघडेल आणि 20 तारखेला बंद होईल. 400 कोटींच्या या IPO चा प्राइस बँड 340 ते 360 रुपये प्रति शेअर आहे.
  3. मोशन्स ज्वेलर्स लिमिटेड चा IPO देखील 18 तारखेला उघडेल आणि 20 तारखेला बंद होईल. 151.09 कोटींच्या या IPO चा प्राइस बँड 52 ते 55 रुपये प्रति शेअर आहे.
  4. हॅप्पी फॉर्जिंन्ग्स लिमिटेडचा IPO 19 तारखेला उघडेल आणि 21 ला बंद होईल. कंपनी याद्वारे 400 कोटी रुपये उभारण्याची तयारी करत आहे. IPO ची किंमत 808 ते 850 रुपये प्रति शेअर आहे.
  5. क्रेडो ब्रँड्स मार्केटिंग लिमिटेडचा IPO देखील 19 डिसेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 21 डिसेंबर रोजी बंद होईल. त्याची किंमत 266 रुपये ते 280 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे.
  6. RBZ ज्वेलर्सचा IPO 19 ते 21 डिसेंबर या कालावधीत सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल, ज्याचा प्राइस बँड 95 ते 100 रुपये प्रति शेअर निश्चित केला आहे.
  7. आझाद इंजिनियरिंग लिमिटेडचा IPO 20 डिसेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 22 रोजी बंद होईल. IPO ची किंमत 499 रुपये ते 524 रुपये आहे.
  8. इनोव्हा कॅपटॅब IPO 21 डिसेंबरला सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 26 डिसेंबरला बंद होईल. IPO ची किंमत 426 रुपये ते 448 रुपये प्रति शेअर आहे.
  9. सहारा मेरिटाइम लिमिटेडचा IPO 18 डिसेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 20 डिसेंबर रोजी बंद होईल. IPO ची किंमत 81 रुपये प्रति शेअर आहे.
  10. इलेक्ट्रो फोर्स (इंडिया) लिमिटेड IPO 19 डिसेंबर रोजी उघडेल आणि 21 डिसेंबर रोजी बंद होईल. एका शेअरची किंमत 93 रुपये प्रति शेअर आहे.
  11. शांती स्पिन्टेक्स लिमिटेड आयपीओ 19 डिसेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 21 डिसेंबर रोजी बंद होईल. प्राइस बँड 66 ते 70 रुपये प्रति शेअर आहे.
  12. ट्रायडेन्ट टेकलॅब्सचा IPO 21 डिसेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 26 डिसेंबर 2023 रोजी बंद होईल. त्याची किंमत प्रति शेअर ₹33 ते ₹35 आहे.

या कंपन्या सूचीबद्ध केल्या जातील

पुढील आठवडाभरात 8 कंपन्यांची लिस्टिंग होणार आहे. यामध्ये DOMS Industries, Indian Shelter Finance Corporation, Prestonic Engineering, SJ Logistics (India), Shree OSFM E-Mobility, Siyaram Recycling Industries, Benchmark Computer Solutions आणि Inox India Limited यांचे IPO समाविष्ट आहेत.

(टीप-शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूकपैसा