Join us  

Share Market Update: भारतीय शेअर बाजार ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर बंद; या क्षेत्रात सर्वाधिक तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 4:07 PM

Share Market Update: शेअर बाजारातील मजबूत वाढीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये ७ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

Stock Market : आठवड्याची दमदार सुरुवात करणाऱ्या भारतीय शेअर बाजाराचा शेवटही तसाच झाला आहे. आठवड्यातील शेवटचे सत्र भारतीय शेअर बाजारासाठी ऐतिहासिक ठरले आहे. बीएसई सेन्सेक्सने प्रथमच ८४,००० चा टप्पा ओलांडला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीनेही विक्रमी उच्चांक गाठला. बँकिंग, ऑटो, आयटी, एफएनसीजी आणि ऊर्जा शेअर्समध्ये देशी-विदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे बाजारात ही वाढ दिसून आली. अमेरिकेच्या फेडरल बँकेने व्याजदरात कपात केल्याचा परिणाम आजही मार्केटमध्ये पाहायला मिळाला. आज कोणते क्षेत्रात तेजी तर कुठे पडझड झाली याचा आढावा घेऊ.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सने आजच्या व्यवहाराच्या शेवटी बीएसई सेन्सेक्स १३३९ अंकांच्या उसळीसह ८४,५४४ वर बंद झाला आणि निफ्टी ४०३ अंकांच्या उसळीसह २५,८१८.७० वर बंद झाला.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ७ लाख कोटींची वाढशेअर बाजारातील या दमदार वाढीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे ७ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. बीएसईवर लिस्टेड शेअर्सचे मार्केट कॅप ४७२.२५ लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे मागील सत्रात ४६५.४७ लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ६.७८ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे.

या शेअर्समध्ये झाले चढउतारआजच्या व्यवहारात सेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी २६ शेअर्स वाढीसह तर ४ शेअर्स तोट्यासह बंद झाले. तर निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी ४३ समभाग वाढीसह बंद झाले तर ७ समभाग तोट्यासह बंद झाले. BSE वर एकूण ४०४९ शेअर्सचे व्यवहार झाले ज्यामध्ये २४४२ शेअर्स वाढीसह बंद झाले आणि १५०१ शेअर्स तोट्यासह बंद झाले. ११६ शेअर्सच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. वाढत्या शेअर्समध्ये महिंद्रा अँड महिंद्रा 5.57 टक्के, आयसीआयसीआय बँक 3.77 टक्के, जेएसडब्ल्यू स्टील 3.66 टक्के, एलअँडटी 3.07 टक्के, भारती एअरटेल 2.84 टक्के, नेस्ले 2.49 टक्के, अदानी पोर्ट्स 2.49 टक्के, एचयूएल 2.09 टक्के, एचडीएफसी 2.09 टक्के असा समावेश आहे. तर घसरलेल्या शेअर्समध्ये एसबीआय 1.07 टक्के, इंडसइंड बँक 0.33 टक्के, टीसीएस 0.27 टक्के आणि बजाज फायनान्स 0.07 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

सेक्टरॉल अपडेटआजच्या व्यवहारात सर्व क्षेत्रातील शेअर्स वाढीसह बंद झाले. बँकिंग, एफएमसीजी, ऑटो, आयटी, एनर्जी, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. आजच्या व्यवसायात मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक