फेडरल रिझर्व्हच्या बैठकीपूर्वी अमेरिकन बाजारातील तेजीचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारातही दिसून आला आहे. आठवड्यातील ट्रेडिंगच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी प्रमुख निर्देशांकांत सकारात्मक सुरुवात दिसून आली आहे. ट्रेडिंग सत्राच्या सुरुवातीला 30-शेअर्सचा सेन्सेक्स 415.68 अंकांच्या तेजीसह पुन्हा एकदा 59 हजारच्या पार, म्हणजेच 59,556.91 पातळीवर ओपन झाला आहे. 50 शेअर्स असलेल्या निफ्टी निर्देशांकातही तेजी दुसून आली आहे.
अमेरिकन बाजारात सुरू असलेली घसरण थांबली -
दुसरीकडे फेडरल रिझर्व्हच्या बैठकीपूर्वी अमेरिकन बाजारात दोन दिवसांपासून सुरू असलेली घसरण थांबली आणि तो दिवसाच्या उच्चांकावर बंद झाला. डाउन जोंस (Dow Jones) 197 अंकांच्या उसळीसह 31,020, तर नॅस्डॅक 87 अंकांच्या वाढीसह 11,535 वर पोहोचला आहे. अमेरिकन बाजाराचा हा परिणाम आशियन बाजारावरही दिसून आला आहे. SGX निफ्टी 130 अंकांनी वाढून जवळपास 17,750 वर ट्रेड करत आहे.
शेअर बाजारातील सोमवारची स्थिती -
यापूर्वी, आठवड्यातील ट्रेडिंगच्या पहिल्या दिवशी जागतीक बाजार कमकुवत दिसत असतानाही, देशांतर्गत शेअर बाजारात गेल्या तीन ट्रेडिंग सत्रापासून सुरू असलेली घसरण सोमवारी थांबली. ट्रेंडिंग सेशनच्या अखेरीस 30 अंकांवर आधारीत बीएसई सेंसेक्स 300.44 अंकांनी वधारून 59,141.23 अंकांवर बंद झाला. तसेच, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टीही 91.40 अंकांच्या उसळीसह 17,622.25 अंकांवर बंद झाला.