Share Market: शेअर बाजारात शुक्रवारी सकाळपासूनच तेजी दिसून आली. सेन्सेक्स दिवसाच्या अखेरीस ११८१.३४ अंकांच्या वाढीसह ६१,७९५.०४ वर बंद झाला तर निफ्टी ३२१.५० अंकांच्या वाढीसह १८,३४९ वर बंद झाला. शेअर बाजारात शुक्रवारी प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची मोठी झेप दिसली. त्याच वेळी, दिवसाच्या व्यवहारात NSE निफ्टीने ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला. सेन्सेक्सनेही मागील ५२ आठवड्यांचा उच्चांकी टप्पा गाठला. शेअर बाजारात एवढी तेजी पाहायला मिळण्याची कारणे कोणती ते जाणून घेऊया-
१. यूएस महागाई डेटा ((US Inflation Data)- ऑक्टोबरमध्ये यूएस रिटेल चलनवाढ अपेक्षेपेक्षा कमी होती. गेल्या आठ महिन्यांत प्रथमच किरकोळ महागाईचा दर ८ टक्क्यांच्या खाली राहिला. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मकता दिसून आली आणि जगभरातील शेअर बाजारात तेजी आली.
२. फेड रिझर्व्हमध्ये शिथिलता अपेक्षित- फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल महागाईच्या आकडेवारीत शिथिलतेमुळे व्याजदर वाढीचा वेग कमी करतील, अशी आशा व्यापारीवर्गात आहे.
३. जागतिक बाजारपेठ- गुरुवारी अमेरिकन शेअर बाजारात मोठी उलाढाल झाली. गेल्या दोन वर्षांतील यूएस शेअर बाजारासाठी गुरुवार हा सर्वोत्तम दिवस ठरला. Dow Jones मध्ये ३.७ टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली. त्याच वेळी, S&P 500 5.54 टक्क्यांनी वाढून बंद झाला. त्याचप्रमाणे नॅस्डॅक कंपोझिट 7.35 टक्क्यांनी वाढून बंद झाला. त्याचा परिणाम आशियाई बाजारपेठांवरही दिसून आला आणि जपानच्या निक्केईने दोन महिन्यांचा उच्चांक गाठला.
४. रुपयाची मजबूत स्थिती- महागाई दराच्या आंकड्यांमधील शिथिलता पाहता 'सेफ हेवन्स' समजल्या जाणाऱ्या डॉलर्सची विक्री करण्यात आली. तसेच अधिक जोखमीचे असेट्सवर दावा सांगितला. त्यामुळे डॉलर घसरला आणि भारतीय रुपया मजबूत झाला. देशांतर्गत चलनात एक टक्क्यांहून अधिक मजबूती दिसली आणि ते डॉलरच्या तुलनेत मजबूत होऊन ८०.८ च्या पातळीवर आले. सप्टेंबरनंतरचा हा उच्चांक आहे.
5. FII प्रवाह- रुपयाच्या मजबूतीमुळे विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा गुंतवणकीकडे वळण्यास प्रोत्साहन मिळाले आहे आणि गेल्या २-३ आठवड्यांपासून ते सतत समभागांची खरेदी करताना दिसत आहेत. NSDL च्या आकडेवारीनुसार, FII ने नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत भारतीय शेअर्समध्ये १९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.