Join us

Stock Market Updates: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,५०० पार, Infosys सह 'या' शेअर्समध्ये तेजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 09:53 IST

Share Market Opening 5th December, 2024: भारतीय शेअर बाजारानं गुरुवारी तेजीसह ग्रीन झोनमध्ये व्यवहार करण्यास सुरुवात केली. पाहा कोणते शेअर्स घसरले, कोणते वधारले?

Share Market Opening 5th December, 2024: भारतीय शेअर बाजारानं गुरुवारी तेजीसह ग्रीन झोनमध्ये व्यवहार करण्यास सुरुवात केली. आठवड्याच्या चौथ्या दिवशी बीएसई सेन्सेक्स २२६.४१ अंकांनी वधारून ८१,१८२.७४ अंकांवर उघडला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ७१.७ अंकांच्या वाढीसह २४,५३९.१५ अंकांवर खुला झाला. बुधवारी शेअर बाजार तेजीसह उघडला आणि वाढीसह बंद झाला. मात्र, कालच्या व्यवहारादरम्यान बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले.

३० पैकी १९ कंपन्या ग्रीन झोनमध्ये

आज सेन्सेक्सच्या ३० पैकी १९ कंपन्या तेजीसह ग्रीन झोनमध्ये तर ९ कंपन्या घसरणीसह रेड झोनमध्ये उघडल्या. तर उर्वरित २ कंपन्यांचे शेअर्स कोणताही बदल न करता उघडले. त्याचप्रमाणे निफ्टी ५० कंपन्यांच्या ५० पैकी २५ कंपन्या वाढीसह ग्रीन झोनमध्ये आणि २४ कंपन्या घसरणीसह रेड झोनमध्ये उघडल्या, तर १ कंपनीच्या शेअरमध्ये कोणताही बदल झाला नाही.

या शेअर्समध्ये तेजी

सेन्सेक्समध्ये इन्फोसिसचे शेअर्स सर्वाधिक १.०४ टक्क्यांनी वधारले. टीसीएस ०.८३ टक्के, बजाज फायनान्स ०.६८ टक्के, आरआयएल ०.५४ टक्के, भारती एअरटेल ०.३४ टक्के, टायटन ०.३२ टक्के, सन फार्मा ०.३२ टक्के, इंडसइंड बँक ०.३१ टक्के, टेक महिंद्रा ०.२७ टक्के, आयटीसी ०.२१ टक्के, एचयूएल ०.२१ टक्के, अॅक्सिस बँक ०.२१ टक्के, आयसीआयसीआय बँक ०.१६ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट ०.१४ टक्के, कोटक महिंद्रा बँक ०.१३ टक्के, एचसीएल टेक ०.१० टक्के, टाटा मोटर्स ०.०८ टक्के, एशियन पेंट्स ०.०२ टक्के आणि बजाज फिनसर्व्ह ०.०१ टक्क्यांनी वधारले.

यामध्ये घसरण

कामकाजाच्या सुरुवातीला आज आज पॉवरग्रिडचे शेअर्स ०.६८ टक्क्यांच्या घसरणीसह उघडले. अदानी पोर्ट्स ०.३६ टक्के, एनटीपीसी ०.३६ टक्के, एचडीएफसी बँक ०.२५ टक्के, जेएसडब्ल्यू स्टील ०.२० टक्के, टाटा स्टील ०.१४ टक्के, मारुती सुझुकी ०.०५ टक्के, लार्सन अँड टुब्रो ०.०३ टक्के आणि नेस्ले इंडिया ०.०२ टक्क्यांनी घसरले. तर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक