Lokmat Money >शेअर बाजार > मार्केट वॉच: बाजारात तेजीचे वातावरण कायम राहणार का? परकीय वित्त संस्थांनी १९३९ कोटी काढले 

मार्केट वॉच: बाजारात तेजीचे वातावरण कायम राहणार का? परकीय वित्त संस्थांनी १९३९ कोटी काढले 

विक्रीचे दडपण येण्याची शक्यता असून बाजार खाली जाऊ शकतो. मात्र, ही घसरण तात्पुरती असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 06:43 AM2024-02-26T06:43:57+5:302024-02-26T06:44:22+5:30

विक्रीचे दडपण येण्याची शक्यता असून बाजार खाली जाऊ शकतो. मात्र, ही घसरण तात्पुरती असेल.

share Market Watch: Will the bullish market continue? 1939 crores were withdrawn by foreign financial institutions | मार्केट वॉच: बाजारात तेजीचे वातावरण कायम राहणार का? परकीय वित्त संस्थांनी १९३९ कोटी काढले 

मार्केट वॉच: बाजारात तेजीचे वातावरण कायम राहणार का? परकीय वित्त संस्थांनी १९३९ कोटी काढले 

- प्रसाद गो. जोशी
या सप्ताहामध्ये अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी अपेक्षित असून काही अपवाद वगळता बाजारामधील तेजीचे वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. भारत व अमेरिकेच्या डिसेंबर तिमाहीच्या जीडीपीची स्थिती या सप्ताहामध्ये जाहीर होणार आहे. याशिवाय भारतामध्ये फ्युचर व्यवहारांची सौदापूर्तीही होणार आहे. तसेच पीएमआय आणि वाहन विक्रीची आकडेवारी, परकीय वित्त संस्थांची कामगिरी यावरही बाजाराची वाटचाल अवलंबून राहील. येत्या गुरुवारी (दि. २९) बाजारात फ्युचर आणि ऑप्शन व्यवहारांची सौदा पूर्ती होईल. यामुळे काहीसे विक्रीचे दडपण येण्याची शक्यता असून बाजार खाली जाऊ शकतो. मात्र, ही घसरण तात्पुरती असेल.

भारतीय रोखे बाजाराकडील ओढा वाढला
गेल्या काही दिवसांपासून परकीय वित्त संस्थांचा भारतीय रोखे बाजाराकडील ओढा वाढल्याचे दिसत आहे. भारत सरकारच्या बॉण्डसचा जेपी मॉर्गन निर्देशांकामध्ये समावेश झाल्याने त्यामध्ये परकीय वित्त संस्थांना रस वाटू लागला आहे. फेब्रुवारीत पहिल्या तीन सप्ताहांमध्ये परकीय वित्तसंस्तांनी बॉण्डसमध्ये १८५०० कोटींची गुंतवणूक केली. जानेवारीत बॉण्डसमध्ये १९,८३६ कोटी गुंतवले आहेत. मागील सहा वर्षांमध्ये एका महिन्यामध्ये भरलेली ही सर्वाधिक रक्कम होती.

परकीय वित्त संस्थांनी १९३९ कोटी काढले 
गतसप्ताहात परकीय वित्त संस्थांनी शेअर्समधून १९३९ कोटी रुपये काढून घेतले आहेत. चालू महिन्यात या संस्थांनी शेअर्समधून १५,८५७ कोटी रुपये काढून घेतले आहेत. देशांतर्गत वित्त संस्था खरेदीच्याच मूडमध्य दिसून आल्या. त्यांनी चालू महिन्यात २०,९२५ कोटी रुपये बाजारात गुंतविले आहेत.

Web Title: share Market Watch: Will the bullish market continue? 1939 crores were withdrawn by foreign financial institutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.