Lokmat Money >शेअर बाजार > शेअर बाजार कोसळण्यामागे शेजाऱ्याचं कारस्थान? परकीय गुंतवणूकदारांना दाखवतायेत आमिष

शेअर बाजार कोसळण्यामागे शेजाऱ्याचं कारस्थान? परकीय गुंतवणूकदारांना दाखवतायेत आमिष

Share Market : गेल्या ३ आठवड्यापासून भारतीय शेअर बाजार अस्थिर झालेला पाहायला मिळत आहे. यामागे शेजारी राष्ट्राचं षडयंत्र असल्याचे समोर आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 10:34 AM2024-10-18T10:34:09+5:302024-10-18T10:37:50+5:30

Share Market : गेल्या ३ आठवड्यापासून भारतीय शेअर बाजार अस्थिर झालेला पाहायला मिळत आहे. यामागे शेजारी राष्ट्राचं षडयंत्र असल्याचे समोर आले आहे.

share market why stock market going down fii selling china cheap valuation major reason | शेअर बाजार कोसळण्यामागे शेजाऱ्याचं कारस्थान? परकीय गुंतवणूकदारांना दाखवतायेत आमिष

शेअर बाजार कोसळण्यामागे शेजाऱ्याचं कारस्थान? परकीय गुंतवणूकदारांना दाखवतायेत आमिष

Share Market : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशा परिस्थितीत भारतीय शेअर बाजारगुंतवणूकदारांची चांगलीच अग्निपरीक्षा घेताना पाहायला मिळत आहे. सप्टेंबर महिन्यात ऐतिहासिक उच्चाकी पातळीवर पोहचलेला बाजार ऑक्टोबर महिना उजाडताच कोसळायला सुरुवात झाली. सलग ३ आठवड्यात शेअर बाजारात विक्रमी घसरण झाली आहे. एकवेळ २६००० चा स्तर ओलांडणारा निफ्टी आता २४८०० च्या खाली व्यवहार करत आहेत. वरच्या स्तरावरून सातत्याने होणारी विक्री बाजारावर वर्चस्व गाजवत आहे. या घसरणीबाबत लोक वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज लावत आहेत. मात्र, भारताला नेहमी पाण्यात पाहणाऱ्या शेजाऱ्याचं हे कारस्थान असल्याचा अंदाज आता वर्तवला जात आहे.

काही लोकांना असे वाटते की इराण आणि इस्रायलमधील तणाव याचे कारण आहे, तर काहींच्या मते कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने बाजारात विक्रीचा दबाव आहे. पण, ऑस्ट्रेलियन ब्रोकरेज फर्मने शेअर बाजारातील या घसरणीचे प्रमुख कारण दिले आहे. चीनच्या बाजारात अलीकडच्या वाढीनंतर परदेशी गुंतवणूकदार नफा मिळविण्यासाठी तेथील बाजारात जाऊ शकतात, असा अंदाज ऑस्ट्रेलियन ब्रोकरेज फर्मने वर्तवला आहे.

चीनकडून घोषणांचा पाऊस
अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी काही दिवसांपूर्वीच चीनच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदर कपात केली होती. त्यानंतर चिनी सरकारने मोठ्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. यामुळे परदेशी गुंतवणूकदार भारतातून पैसा काढून चीनमध्ये लावत आहेत. ऑस्ट्रेलियन ब्रोकरेज कंपनीने म्हटले आहे की भारतीय शेअर बाजार सध्या ३ 'नकारात्मक' परिस्थितींशी झुंजत आहे, ज्यामध्ये कमकुवत आर्थिक वाढ आणि उच्च मूल्यांकन यांचा समावेश आहे. दुसरीकडे, चीन आपल्या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देण्यासाठी मोठी आर्थिक मदत पॅकेजेस आणि इतर उपायांची घोषणा करत आहे.

भारतीय शेअर बाजारात विक्रीचा दबाव
ऑस्ट्रेलियन ब्रोकरेज मॅक्वेरी यांनी एका नोटमध्ये म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांत देशांतर्गत प्रवाहामुळे भारतीय बाजारपेठांमध्ये चांगली वाढ झाली आहे. परंतु, त्यांनी प्रति शेअर उच्च कमाईची अपेक्षा देखील गमावली आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदार (FII) भारतीय बाजारात सतत विक्री करत आहेत, ज्यामुळे वरच्या स्तरावर बाजारात घसरण होत आहे.

Web Title: share market why stock market going down fii selling china cheap valuation major reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.