Lokmat Money >शेअर बाजार > मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये जोरदार विक्री, बाजार घसरणीसह बंद; 'या' शेअर्सचे सर्वाधिक नुकसान

मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये जोरदार विक्री, बाजार घसरणीसह बंद; 'या' शेअर्सचे सर्वाधिक नुकसान

Share Market Updates: हा आठवडा देखील शेअर बाजारात मोठ्या घसरणीने संपला. बाजारात मोठी विक्री झाल्याने अनेक कंपन्यांचे शेअर्स आपटले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 04:06 PM2024-11-08T16:06:45+5:302024-11-08T16:06:45+5:30

Share Market Updates: हा आठवडा देखील शेअर बाजारात मोठ्या घसरणीने संपला. बाजारात मोठी विक्री झाल्याने अनेक कंपन्यांचे शेअर्स आपटले.

share markets today 8th november sensex nifty live trump wins global markets positive gift nifty down q2 results zee business | मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये जोरदार विक्री, बाजार घसरणीसह बंद; 'या' शेअर्सचे सर्वाधिक नुकसान

मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये जोरदार विक्री, बाजार घसरणीसह बंद; 'या' शेअर्सचे सर्वाधिक नुकसान

Share Market Updates: ऑक्टोबर महिन्यातील घसरण नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी थांबायचं नाव घेताना दिसत नाही. मधे दोनचार दिवस सोडले तर महिन्याभरापासून शेअर बाजारात घसरण सुरुच आहे. हा आठवडा पुन्हा शेअर बाजारात मोठ्या घसरणीने संपला. आज पुन्हा बाजारात मोठी विक्री दिसून आली. निफ्टी ५१ अंकांनी घसरून २४,१४८ वर बंद झाला. सेन्सेक्स ५५ अंकांनी घसरून ७९,४८६ वर आणि निफ्टी बँक ३५५ अंकांनी घसरून ५१,५६१ वर बंद झाला. आज सर्वात मोठी घसरण मिड आणि स्मॉलकॅप निर्देशांकात झाली.

निफ्टीतील निम्म्याहून अधिक कंपन्यांचे शेअर्स रेड झोनमध्ये
आज, बीएसई सेन्सेक्समधील ३० पैकी १६ कंपन्यांचे शेअर्स वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले तर उर्वरित १४ शेअर्स नुकसानासह लाल रंगात बंद झाले. त्याचप्रमाणे निफ्टी ५० पैकी २३ कंपन्यांचे शेअर्स वाढीसह हिरव्या रंगात आणि उर्वरित २७ कंपन्यांचे शेअर्स नुकसानासह लाल रंगात बंद झाले.

महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ
सेन्सेक्समधील ३० कंपन्यांपैकी महिंद्रा अँड महिंद्राचा शेअर्स आज सर्वाधिक २.६९ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. याशिवाय टायटन २.१३ टक्के, टेक महिंद्रा १.९० टक्के, नेस्ले इंडिया १.४४ टक्के, इन्फोसिस १.३१ टक्के, हिंदुस्थान युनिलिव्हर १.१८ टक्के, अदानी पोर्ट्स ०.७८ टक्के, जेएसडब्ल्यू स्टील ०.६९ टक्के, सन फार्मा ०.६४ टक्के, पॉवरग्रिड ०.४८ टक्के, एचडीएफसी बँक ०.४८ टक्के, लार्सन अँड टुब्रो ०.३३ टक्के, आयटीसी ०.१९ टक्के, बजाज फिनसर्व्ह ०.१६ टक्के, ॲक्सिस बँक ०.०६ टक्के आणि क्लोज ०.०६ टक्के नफ्यासह बंद झाले.

एशियन पेंट्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण
दुसरीकडे, एशियन पेंट्सच्या शेअर्समध्ये सर्वाधिक २.६१ टक्क्यांची घसरण झाली. टाटा स्टील २.२२ टक्के, स्टेट बँक ऑफ इंडिया १.८६ टक्के, टाटा मोटर्स १.७२ टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीज १.६६ टक्के, एनटीपीसी १.५६ टक्के, आयसीआयसीआय बँक १.५३ टक्के, भारती एअरटेल ०.४७ टक्के, टीसीएस ०.४१ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट ०.२९ टक्के, मारुती सुझुकी ०.२८ टक्के, इंडसइंड बँक ०.२६ टक्के, बजाज फायनान्स ०.११ टक्के आणि कोटक महिंद्रा बँक शेअर ०.०४ टक्क्यांनी घसरुन बंद झाले.
 

Web Title: share markets today 8th november sensex nifty live trump wins global markets positive gift nifty down q2 results zee business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.