Lokmat Money >शेअर बाजार > एनएसईच्या सर्व निर्देशांकातून Jio Financial Services चा शेअर होणार बाहेर, काय होणार परिणाम?

एनएसईच्या सर्व निर्देशांकातून Jio Financial Services चा शेअर होणार बाहेर, काय होणार परिणाम?

२१ ऑगस्ट २०२३ रोजी जिओ फायनान्शियलचा शेअर स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट झाला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 11:19 AM2023-09-06T11:19:21+5:302023-09-06T11:20:17+5:30

२१ ऑगस्ट २०२३ रोजी जिओ फायनान्शियलचा शेअर स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट झाला होता.

Share of Jio Financial Services will be out of all indices of NSE what will be the effect know details | एनएसईच्या सर्व निर्देशांकातून Jio Financial Services चा शेअर होणार बाहेर, काय होणार परिणाम?

एनएसईच्या सर्व निर्देशांकातून Jio Financial Services चा शेअर होणार बाहेर, काय होणार परिणाम?

Jio Financial Services Share: ७ सप्टेंबरपासून राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी ५० निर्देशांकासह सर्व निर्देशांकांमधून जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा शेअर बाहेर होणार आहे. एनएसईनं एक प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे. जरी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचा स्टॉकनं ६ सप्टेंबर रोजी अपर किंवा लोअर प्राईज बँडला हिट केलं तरी निर्देशांकातून बाहेर होण्याची प्रक्रिया आता पुढे ढकलली जाणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.

एनएसईनं ५ सप्टेंबर २०२३ रोजी एक निवेदन जारी केलं. निर्देशांक नियमांनुसार ४ सप्टेंबर आणि ५ सप्टेंबर रोजी जिओ फायनान्शिअलचे शेअर्स एनएसईवर अपर किंवा लोअर बँडच्या किंमतीवर हिट झालेले नाहीत. अशा परिस्थितीत, इंडेक्स मेन्टेनन्स सब कमिटी इक्विटीनं ६ सप्टेंबर क्लोझिंगनंतर म्हणजे ७ सप्टेंबरपासून जिओ फिनचा स्टॉक एनएसईमध्ये कोणत्याही निर्देशांकात समाविष्ट केला जाणार नसल्याचा निर्णय घेतला आहे, असं यात नमूद करण्यात आलंय.

सध्या, जिओ फायनान्शिअलचा शेअर निफ्टी ५०, निफ्टी १००, निफ्टी २००, निफ्टी एनर्जी, निफ्टी इंडिया मॅन्युफॅक्चरिंगसह १३ इतर निर्देशांकांमध्ये समाविष्ट आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा शेअर आधीच बीएसईच्या सर्व निर्देशांकातून हटवण्यात आलाय.

२१ ऑगस्टला झाला लिस्ट
२१ ऑगस्ट २०२३ रोजी जिओ फायनान्शियलचा शेअर स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट झाला होता. त्यानंतर सातत्यानं त्यात लोअर सर्किट लागलं होतं. पण २५ ऑगस्टनंतर अनेक संस्थात्मक गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंडांनी शेअरमध्ये मोठी खरेदी केली. दुसरीकडे, २८ ऑगस्ट रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजची एजीएम पार पडली. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी जिओ फायनान्शिअल लवकरच विमा क्षेत्रात पाऊल टाकणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर शेअरच्या किंमतीत सातत्यानं वाढ झाली.

Web Title: Share of Jio Financial Services will be out of all indices of NSE what will be the effect know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.